मुंबई: प्रत्येक आई-वडील आपल्या मुलांचे संगोपन जितके शक्य होईल तितके चांगले करण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे भविष्य सुधारण्यासाठी प्रयत्न करत असतात. दरम्यान, काही आई-वडील आपल्या या संगोपनादरम्यान काही अशा चुका करतात ज्या भविष्यात नुकसानदायक ठरू शकतात.
याच कारणामुळे आचार्य चाणक्य यांनी काही चुकांचे वर्णन नीतीशास्त्रात केले आहे. या चुका व्यक्तीने करू नये.
आचार्य चाणक्य यांच्यानुसार मुलांसमोर आई-वडिलांनी कडवट शब्द अथवा अभद्र शब्दांचा वापर करू नये. खरंतर आई-वडील जसे करतात तसेच अनुकरण मुलेही करतात.
आचार्य चाणक्य म्हणतात खोटे बोलणे अयोग्य आहे आणि ते जर मुलांसमोर बोलले गेले तर त्याचा वाईट प्रभाव मुलांवर होतो. आई-वडील खोटे बोलत असतील तर मुलेही खोटे बोलण्यास सुरू करतात. हीच सवय भविष्यात त्यांना बिघडवू शकते.
आचार्य चाणक्य यांच्या मते आई-वडीलांनी मुलांसमोर नेहमी एकमेकांचा आदर केला पाहिजे. जेव्हा मुले आई-वडिलांना एकमेकांचा आदर करताना पाहतील तेव्हा ते इतरांचाही आदर करतील.