भिवंडी: भिवंडी महानगरपालिका प्रशासक आयुक्त अजय वैद्य यांनी भिवंडी शहरात विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतलेली असून या स्वच्छता मोहिमेंतर्गत भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात कचेरी पाडा येथील मनपा शाळा अंतर्गत स्वच्छता अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या स्वच्छता मोहीम कार्यक्रमात शाळेतील 800 विद्यार्थी तसेच शिक्षक,महानगरपालिकेतील कर्मचारी यांनी सहभाग घेतला भिवंडी पूर्व आमदार रईस शेख,पालिका आयुक्त उपायुक्त नयना ससाणे मॅडम उपस्थित होते.
यावेळी परिसरामध्ये वृक्षरोपण करून शाळेतील विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन ओला कचरा सुका कचरा वर्गीकरण करावे व आपला परिसर स्वच्छ ठेवावा अशी विद्यार्थ्यांकडून जनजागृती परिसरामध्ये करण्यात आली