Wednesday, April 23, 2025
Homeब्रेकिंग न्यूजऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळेला एक कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर

ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळेला एक कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर

शाब्बास स्वप्नील… तुझ्या कांस्य पदकामुळे महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर पसरले हास्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : शाब्बास स्वप्नील… तुझ्या कांस्य पदकामुळे महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर हास्य पसरले आहे. तुझी कामगिरी महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. तू आमचा अभिमान आहेस, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमबाज स्वप्नील कुसाळेचे अभिनंदन केले. तसेच या कामगिरीसाठी स्वप्नीलला एक कोटी रुपयांचे पारितोषिक दिले जाईल, असे जाहीर केले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पॅरीसमध्ये असलेल्या ऑलिंपिकवीर स्वप्नीलशी तसेच त्याच्या प्रशिक्षक दिपाली देशपांडे, विश्वजीत शिंदे यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संपर्क साधला.

मुख्यंमत्री श्री. शिंदे म्हणाले, स्वप्नीलचे रौप्य पदक अवघ्या ०.१ गुणांनी हुकले आहे. तरीही त्याने कांस्य पदक पटकावल्याने महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. महाराष्ट्राला वैयक्तिक कामगिरीसाठी ७२ वर्षांनी पदक मिळाले आहे. या कामगिरीसाठी स्वप्नीलला एक कोटी रुपयांचे पारितोषिक दिले जाईल. त्याचा आणि त्याचे प्रशिक्षक, आई-वडील यांचा यथोचित सत्कारही केला जाईल. याशिवाय स्वप्नीलला नेमबाजीतील पुढील तयारीसाठी आवश्यक, त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. स्वप्नीलने आपल्या कामगिरीने इतिहास रचला आहे. या यशासाठी कुसाळे कुटुंबियांसह, त्याला मार्गदर्शन करणारे, प्रशिक्षक आदींची मेहनत महत्वाची ठरली आहे.

स्वप्नील कुसळे याने ऑलम्पिकमध्ये खाशाबा जाधव यांच्यानंतर पहिले पदक मिळवले आहे. स्वप्नील कुसळे यांचे अभिनंदन करतो. देशाचा मान त्यांनी वाढवला त्यासाठी त्यांचे अभिनंदन करतो. – उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस

… म्हाया नातवानं करुन दावलं!

नातवानं ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर स्वप्नीलच्या आज्जीच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. आज्जीचे डोळे आंनदाश्रूंनी भरले होते. “लय चांगलं झालं… म्हाया नातवानं करुन दावलं, माझा नातू लय मोठ्ठा झाला… आमचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी हाय… लहानाचा मोठ्ठा झालाय, लहानपणापासून बाहेर गेलाय, लय चांगलं झालं, असे स्वप्नीलची आज्जी म्हणाली.

दरम्यान, पुण्यातील क्रीडा प्रबोधिनीमध्येच सराव करताना नेमबाजीचा चांगला पाया घातला गेला. माझ्या यशात कुटुंबियांसह, आईच्या मायेने प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षक श्रीमती देशपांडे, श्री. शिंदे यांचा मोलाचा वाटा आहे, असे ऑलिंपिकवीर स्वप्नील म्हणाला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -