मुंबई: व्यायाम आपले शरीर, मेंदू आणि मानसिक आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. यामुळे आपली ऊर्जा वाढते. तसेच आपले जीवन सुधारते. तज्ञांच्या मते आठवड्यातून ५ दिवस ३० मिनिटांसाठी व्यायाम केला पाहिजे. मात्र अनेकदा व्यायाम करताना आपण काही चुका करतो ज्यामुळे मेहनत बेकार होऊन जाते.
वर्कआऊट सोडून देणे
जर तुम्ही कारणाशिवाय वर्कआऊट करणे सोडून देत असाल तर हे तुमची प्रगती धीमी करतात. यामुळे तुम्हाला तुमचे फिटनेसचे लक्ष्य गाठता येत नाही. व्यायामामध्ये नियमितता असावी.
वर्कआऊटच्या आधी खाणे
वर्कआऊटच्या आधी भरपूर खाल्ल्याने आपले शरीर ते पचवण्यामध्ये व्यस्त राहते. यामुळे मांसपेशीमधून योग्य प्रकारे रक्ताचा प्रवाह होत नाही. याऐवजी वर्कआऊट करण्याच्या २ तास आधी हलका नाश्ता करा.
वॉर्म अप न करणे
वर्कआऊटच्या आधी वॉर्मअप करणे गरजेचे आहे. यामुळे शरीराचे तापमान वाढते. रक्तप्रवाह वाढतो आणि मांसपेशी मोकळ्या होतात. हलके स्ट्रेचिंग, जॉगिंग अथवा सायकल चालवणे वॉर्मअपच्या पद्धती आहेत.