Friday, October 31, 2025
Happy Diwali

भिवंडीत महिला अत्याचार विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून तीव्र निषेध आंदोलन

भिवंडीत महिला अत्याचार विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून तीव्र निषेध आंदोलन

भिवंडी: राज्यात महिलांवर होणारे अत्याचार वाढले असून नराधम मोकाट फिरत आहेत त्यामुळे महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे .

तसेच नुकताच उरण प्रकरणांमध्ये यशश्री शिंदे हिच्या मारेकर्याला कडक शिक्षा व्हावी या मागणीसाठी भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथे ठाणे जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी महिला काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

महिला आघाडीच्या अध्यक्ष डॉ.रूपाली कराळे यांच्या नेतृत्वाखाली कोनगाव मध्ये सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला तसेच जोरदार घोषणाबाजी करत आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >