Wednesday, May 21, 2025

मनोरंजनताज्या घडामोडी

शिल्पा शेट्टीच्या पतीने खरेदी केली नवी गाडी, किंमत १ कोटी, २ कोटी नव्हे तर...

शिल्पा शेट्टीच्या पतीने खरेदी केली नवी गाडी, किंमत १ कोटी, २ कोटी नव्हे तर...

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि बिझनेसमन राज कुंद्रा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहतात. अनेकदा ते वादाचाही भाग बनले आहेत. ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत मात्र एखाद्या वादामुळे नव्हे तर आपल्या नव्या कारमुळे. त्यांनी एक शानदार कार खरेदी केली आहे.


राज कुंद्रा यांच्याकडे अनेक लक्झरी गाड्या आहेत. आता त्यांच्या कार कलेक्शनमध्ये आणखी एक गाडी दाखल झाली आहे.


 


शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांनी एक चमचमणारी कार खरेदी केली आहे. हिरव्या रंगाची ही गाडी दिल्लीत रजिस्टर्ड आहे. याचा नंबर 'DL 02C 0001 TC 1' आहे. नव्या कारमध्ये राज कुंद्रा आपल्या मुलासह फिरताना दिसले. ही हिरव्या रंगाची कार लोटस इलेट्रे आहे.


लोटस इलेक्ट्रेच्या किंमतीबाबत बोलायचे झाल्यास याची किंमत लाखोंमध्ये नव्हे तर कोट्यावधींमध्ये आहे. मिडिया रिपोर्ट्सनुसार या कारची किंमत २.५५ कोटी रूपये आहे. शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांच्याकडे आधीपासूनच अनेक लक्झरी गाड्या आहेत. त्यांच्या कार कलेक्शनमध्ये Porsche Cayenne, BMW i8, Mercedes Benz GL350 CDI आणि Bentley Flying Spur या गाड्यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment