मुंबई: शनी सगळ्यात धीमी गतीने चालणारा ग्रह आहे. शनिच्या चालीमध्ये परिवर्तन झाल्यास त्याचा परिणाम इतर राशींवर होत असतो. काही राशींसाठी शनी मार्गी झाल्यास शुभ परिणाम मिळतील तर काही राशींवर याचा उल्टा परिणाम पाहायला मिळू शकतो.
शनि या वेळेस कुंभ राशीमध्ये विराजमान आहे. कुंभ राशीमध्ये शनी वक्री अवस्थेत आहे. शनी २९ जून २०२४मध्ये वक्री चाल खेळत होते. शनी १३९ दिवस वक्री अवस्थेत कुंभ राशीत मार्गी होतीला. शनी १५ नोव्हेंबर २०२४ रात्री ७.१५ मिनिटांनी मार्गी होतील. दरम्यान, शनी जेव्हा सामान्य गतीने भ्रमण करतात त्याला सरळ मार्गी म्हणतात. शनीची सरळ चालीचा परिणाम अनेक राशींसाठी आनंदाची बातमी आणू शकतो.
कर्क रास
कर्क राशीच्या लोकांन शनी सरळ मार्गी झाल्यास लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. कर्क राशीच्या लोकांवर सध्या शनीची दृष्टी आहे. शनी वक्रीनंतर मार्गी झाल्यानंतर या राशीला लाभ होईल. आर्थिक रूपाने तंगी संपेल.
वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी २०२४मध्ये १५ नोव्हेंबरनंतर शनी मार्गी झाल्याने लाभ होणार आहे. दीर्घकाळापासून आर्थिक आणि मानसिक तणावात असलेले वृश्चिक राशीचे लोकांचा त्रास संपणार आहे.
मकर रास
मकर राशीच्या लोकांना १५ नोव्हेंबर २०२४ म्हणजेच शनी मार्गी झाल्याने लाभ होऊ शकतो. मकर राशीच्या लोकांवर सध्या साडेसाती सुरू आहे.
कुंभ रास
शनी यावेळेस कुंभ राशीत विराजमान आहे. या राशीमध्ये शनी वक्री अवस्थेत आहे. शनी मार्गी झाल्याने कुंभ राशींचे नशीब उघडू शकते. आर्थिक, मानसिक आणि शारिरीक समस्या संपून जातील.
मीन रास
मीन राशीच्या लोकांवर सध्या साडेसाती सुरू आहे. शनीची सरळ चाल मीन राशींना लाभदायक ठरू शकते. या राशींच्या समस्या लवकरच संपणार आहेत.