शिवडी : सध्या देशभरात उरणमधील यशश्री प्रकरण चर्चेत असताना मुंबईतून (Mumbai Crime) एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. मुंबईतील शिवडी (Sewri) परिसरातील एका ३० वर्षीय नराधमाने चिमुकलीवर अत्याचार केल्याचे संतापजनक कृत्य उघडकीस आले आहे. याप्रकरणी नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. परंतु या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवडी येथे ३० वर्षीय नराधमानेच ५ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. ही चिमुकली आवारात खेळत असताना शेजारी राहणाऱ्या इसमाने तिला उचलून स्वत:च्या घरी नेले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार केला. दरम्यान लहान मुलीची विचारपूस केली असता हे प्रकरण उघडकीस आले.
या प्रकरणी आरएके मार्ग पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम ६५(२) आणि पोक्सो कायद्याअंतर्गत आरोपीला अटक करण्यात आली आहे. मात्र या अत्याचाराच्या घटनेने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. त्याचबरोबर आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी देखील करण्यात येत आहे.