Tuesday, July 8, 2025

Kamika Ekadashi: आज आहे कामिका एकादशी, हे आहे महत्त्व

Kamika Ekadashi: आज आहे कामिका एकादशी, हे आहे महत्त्व

मुंबई: आज कामिका एकादशी आहे. हे पर्व भगवान विष्णूंना समर्पित केले जाते. या दिवशी भगवान विष्णू तसेच धनदेवता लक्ष्मी मातेची पुजा केली जाते. ३१ जुलै ही एकादशी साजरी केली जात आहे.


या तिथीला भगवान विष्णूंची पुजा तसेच व्रत केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. या दिवशी भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण केल्याने पाप नष्ट होतात.



कामिका एकादशीचे महत्त्व


या दिवशी शंख, चक्र, गदाधारी भगवान विष्णूची पुजा केली जाते. भीष्म पितामह यांनी नारदमुनींना याचे महत्त्व सांगितले आहे. मनुष्य या एकादशीच्या दिवशी धूप, दीप, नैवेद्य इत्यादीकडून भगवान विष्णूची पुजा करतात. त्यांना गंगा स्नान केल्याने उत्तम फलप्राप्ती होते.


एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या समोर तूप अथवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा. असा दिवा लावल्याने पित्रांना स्वर्गामध्ये अमृत मिळते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >