Tuesday, April 22, 2025
HomeदेशWayanad Landslide: वायनाड भूस्सखलनात ११६ जणांचा मृत्यू, रेस्क्यू ऑपरेशन सुरू

Wayanad Landslide: वायनाड भूस्सखलनात ११६ जणांचा मृत्यू, रेस्क्यू ऑपरेशन सुरू

मुंबई: भारतातील केरळ हे पर्यटनाचे सुंदर ठिकाण. देश-विदेशातील पर्यटक येथील स्थळांना भेटी देण्यासाठी येतात. मात्र निसर्गाचा कहर झाला आणि त्याचे भयंकर परिणाम केरळमध्ये पाहायला मिळाले. अशी ही दुर्घटना केरळमध्ये पहिल्यांदाच घडली असावी. कालपर्यंत जिथे हिरवळ पसरली होते तेथे आता केवळ मातीचा चिखल, ढिगाऱ्याखाली अडकेली माणसे, आपल्या जिवाभावाच्या माणसांसाठी फोडला जाणारा हंबरडा इतकेच दिसत आहे.

केरळच्या वायनाड जिल्ह्यात भयंकर दुर्घटना घडली आहे. जोरदार पावसामुळे झालेल्या भूस्सखलनात आतापर्यंत ११६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल १३१ जण जखमी झाले आहेत. अद्याप ९० जण अडकल्याची माहिती मिळत आहे.

घटनास्थळी बचावकार्य वेगात सुरू आहे. दर तासागणिक येथील परिस्थिती त्रासदायक होत आहे. बचावकार्यासाठी जवानांची फौज तैनात आहे. केरळ सरकारकडून दोन दिवसाचा शोक घोषित करण्यात आला आहे. मलब्याखाली अनेकजण दबलेले आहेत. त्यांच्या शोध घेण्यासाठी ड्रोन आणि श्वान पथकाची मदत घेतली जात आहे.

भूस्सखलनामुळे मेप्पडी, मुंडक्कई डाऊन चूरल माला मध्ये शेकडो लोक घरांखाली तसेच मलब्याखाली दबले गेलेले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या घटनेप्रकरणी शोक व्यक्त केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -