जाणून घ्या कोणत्या आहेत त्या रास?
मुंबई : ज्योतिषशास्त्रात शुक्रदेवाला (Venus) विशेष महत्त्व आहे. शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ग्रहांच्या या परिवर्तनाचा प्रत्येक राशीवर काही ना काही परिणाम होत असतो. शुक्र एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी सुमारे एक महिना लागतो. (Shukra Gochar) आता धन दाता शुक्र ग्रह उद्या बुधवारी दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे याचा प्रभाव इतर काही राशींवरही दिसून येणार आहे. त्यामुळे या राशीतील (Horoscope) लोकांचे भाग्य अधिक उजळणार आहे. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या रास.
मिथुन रास (Gemini)
शुक्राचे गोचर मिथुन राशीसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या राशीतील लोकांना वरिष्ठांकडून मान मिळणार असून करिअरच्या क्षेत्रातही यांना सकारात्मक परिणाम दिसणार आहे. त्यासोबत लोकांचे सहकाऱ्यांसोबत सुरू असलेले गैरसमजही दूर होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर व्यावसायिकांना याकाळात मोठा नफा मिळी शकतो. तसेच आरोग्य देखील उत्तम राहिल.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीतील लोकांची या कालावधीत चांगली कमाई होण्याची चिन्हे आहेत. कामाच्या ठिकाणी कौतुक होणार असून यासोबतच प्रमोशनही मिळू शकेल. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर या काळात तुम्ही भाग्यवान ठरू शकता. नफा मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुमची आर्थिक स्थितीही चांगली राहील. जोडीदारासोबतचे संबंधही चांगले राहतील.
सिंह रास (Leo)
शुक्र गोचरच्या परिवर्तन काळात नोकरीच्या शोधात असलेल्या सिंह राशीतील लोकांना चांगला लाभ मिळू शकतो. यासोबतच तुम्ही कामाच्या संदर्भात अनेक सहली करू शकता, यातूनही तुम्हाला लाभ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. तुम्ही व्यवसायात तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना खडतर स्पर्धा देताना देखील दिसाल, यामुळे तुम्हाला भरपूर नफा मिळेल. तुमची आर्थिक स्थितीही चांगली राहील. तुम्ही जास्त पैसे कमावण्यात यशस्वी होऊ शकता.
(टीप : वरील सर्व माहिती ज्योतिषशास्त्रांच्या आधारे दिली गेली आहे. ‘प्रहार’ याबाबतची कोणतीही पुष्टी करत नाही. )