Saturday, May 10, 2025

देशमहत्वाची बातमी

झारखंडमध्ये मोठा रेल्वे अपघात, हावडा-मुंबई मेलचे १८ डबे रूळावरून घसरले

झारखंडमध्ये मोठा रेल्वे अपघात, हावडा-मुंबई मेलचे १८ डबे रूळावरून घसरले
झारखंड: झारखंडच्या चक्रधरपूर रेल्वे मंडळाच्या बाराबम्बो रेल्वे स्टेशनजवळ हावडा-मुंबई मेल एक्सप्रेसला अपघात झाला. रेल्वेचे १८ डबे रूळावरून घसरले. दरम्यान, या अपघातात ६ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी रेल्वे कर्मचाऱ्यांसोबत एआरएम, एडीआरएम आणि सीकेपीच्या टीम पोहोचल्या आहेत. जखमींना तातडीने रेस्क्यू केले जात आहे.

घटनेला दुजोरा देताना अधिकाऱ्याने सांगितले की १२८१० हावडा-सीएसएमटी एक्सप्रेस सकाळी पावणेचारच्या सुमारास चक्रधरपूर डिव्हीजनचे राजखरसवा वेस्ट आऊट आणि बाराबम्बो या दरम्यान चक्रधरपूरजवळ १८ डबे रूळावरून घसरल्याची सूचना मिळाली होती.

 



SER च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले, मुंबई-हावडा मेलचे अनेक डब्बे बाराबम्बोच्या जवळ पटरीवर उतरले. या अपघातात सहा प्रवासी जखमी झालेत. त्यांच्यावर बाराबम्बोमध्ये प्राथमिक उपचार दिले जात आहेत.
Comments
Add Comment