भिवंडी महानगरपालिकेच्या पत्रकार कक्षाची दुरावस्था, कपाटं गंजली; पत्रकारांना सुविधा देण्याची मागणी
भिवंडी : भिवंडी महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीत पत्रकार कक्ष असून सदर पत्रकार कक्षाची दुरावस्था झाली आहे. सदर पत्रकार कक्षात पत्रकारांसाठी पुरेशी आसन व्यवस्था नाही. अनेक कपाटाना गंज सुद्धा लागलं आहे. तसेच पत्रकार कक्षा समोर पाणीपोई असून ती सुद्धा बंद अवस्थेत आहे.
नागरी समस्या सोडवण्यासाठी दुवा समजल्या जाणाऱ्या पत्रकारांना मनपाच्या पत्रकार कक्षाच्या दुरावस्थेने वृत्तांकनासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तर कोरोना काळात पत्रकारांसाठी देण्यात आलेले लॉकरही गंज खात पडले आहेत. अद्यापही ते पत्रकारांना वाटप करण्यात आलेले नाही. त्यामुळे पत्रकारांमधून संताप व्यक्त होत आहे. तात्काळ हे लॉकर वाटप करण्यात यावे, अशी मागणी पत्रकारांकडून केली जात आहे.