Tuesday, May 20, 2025

क्रीडामहत्वाची बातमी

भारत पुढील टी-२० आशिया कपचे यजमानपद भूषवणार, बांगलादेशला २०२७मध्ये संधी

भारत पुढील टी-२० आशिया कपचे यजमानपद भूषवणार, बांगलादेशला २०२७मध्ये संधी

मुंबई: भारत २०२५मध्ये होणाऱ्या टी-२० आशिया कपचे यजमानपद सांभाळणार आहे. ही स्पर्धे टी-२० वर्ल्डकप २०२६च्या एक वर्ष आधी होणार आहे.दरम्यान, आशिया कपमुळे वर्ल्डकपपूर्वी आशियाई संघाना तयारीची संधी मिळत आहे. आशियाई क्रिकेट काऊन्सिलने टी-२० आशिया कप स्पर्धेची माहिती सोमवारी दिली.


आशिया कपचा खिताब सध्या भारताकडे आहे. गेल्या ४ पैकी तीन आशिया कप भारतानेच जिंकले आहेत. २०१६ पासून आशिया कपला नेहमी वर्ल्डकपच्या तयारीच्या दृष्टीने पाहिले जाते. याच कारणामुळे आशिया कप त्या फॉरमॅटमध्ये खेळवला जातो ज्यात वर्ल्डकप स्पर्धा रंगणार आहे.


नुकताच श्रीलंकेच्या महिला क्रिकेट संघाने आशिया कपचे यजमानपद भूषवले होते. तसेच या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाला हरवत जेतेपद मिळवले. आशिया कप स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, अफगाणिस्तान हे देश एकमेकांविरुद्ध खेळतात.


Comments
Add Comment