मुंबई: भारताचा स्टार जॅवेलिन थ्रो खेळाडू नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपला जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. नीरज मंगळवारी ३० जुलैला पॅरिसमध्ये पोहोचला. २६ वर्षीय या स्टार खेळाडूची ६ ऑगस्टला पुरुषांच्या ग्रुप ए जॅव्हेलिन थ्रो क्वालिफिकेशन राऊंड असणार आहे.
हरयाणामध्ये जन्मलेल्या या प्रतिभावान खेळाडूने टोकियो २०२०च्या ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले होते. नीरज यावेळेसही सुवर्णपदकाचा दावेदार म्हणून उतरेल.
पॅरिस पोहोचण्याची माहिती नीरज चोप्राने सोशल मीडियावर दिली. त्यांनी ऑफिशियल ट्विटर हँडलवर दोन फोटो शेअर करताना लिहिले, नमस्कार पॅरिस, अखेर खेळाच्या गावी पोहोचून उत्साहित आहे. नीरज पहिल्या फोटोत आपल्या कोचसोबत दिसत आहे तर दुसऱ्या फोटोत तो सरावसाठी एकटा बसलेला दिसत आहे.
नमस्कार, Paris! 🇮🇳🇫🇷
Excited to finally reach the Olympic Games village. #Paris2024 pic.twitter.com/qinx6MsMDl
— Neeraj Chopra (@Neeraj_chopra1) July 30, 2024
नीरजकडे सलग २ ऑलिम्पिक पदक जिंकण्याची संधी
नीरज चोप्राकडे इतिहास रचण्याची संधी आहे. त्याने जर या ऑलिम्पिकमध्येही सुवर्णपदक जिंकले तर तो सलग दोन सुवर्णपदके जिंकणारा भारतीय खेळाडू ठरेल. नीरजने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ८७.५८ मीटरच्या थ्रो सह सुवर्णपदकावर निशाणा साधला होता. तेव्हा नीरज ट्रॅक अँड फिल्डमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला होता.