मुंबई: सर्दी झाल्यानंतर मुलांच्या घशामध्ये कफ जमा होऊ लागतो. हा ठीक करण्यासाठी अनेकदा आई-वडील मुलांना खोकल्याचे औषध देतात. मात्र खोकल्याचे औषध देण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी जरूर घेतली पाहिजे.
जेव्हा मुलांना कफ सिरप दिले जाते तेव्हा एक गोष्ट जरूर पाहा सिरपच्या पुढे डी हा शब्द न लिहिलेला पाहिजे. डॉक्टरांच्या मते डीचा डेक्स्ट्रोमीथोफॅन असते. हा एक कफ सप्रेसेंट आहे. ५ वर्षांहून लहान मुलांना अशा पद्धतीचे कफ सिरप देता येत नाही.
कफ सिरप मुलांना अशा प्रकारे प्यायला द्या जेणेकरून ते मुलांच्या छातीत कफ अडकून राहणार नाही तसेच खोकलाही वाढणार नाही. तसेच मुलांमध्ये न्यूमोनियाचा धोका वाढतो.
५ वर्षाच्या छोट्या मुलांना टरबूटेलाईन अथवा लेवोसालबुटामोल कॉम्बिनेशन कफ सिरप द्या. हे एक ब्रांकोडायलेटर आहे जे मुलांची श्वासनलिका मोकळी करते.
अशी औषधे प्यायल्याने मुलांना आराम मिळतो आणि श्वास घेण्यास त्रास होत नाही.