भिवंडी : भिवंडी तालुक्यातील कोनगाव हद्दीत एका मोबाईल दुकानात मध्यरात्रीच्या सुमारास घरफोडीची घटना घडली.
कोनगाव येथील साई रेसीडेन्सी येथे यश कलेक्शन नावाचे मोबाईल दुकान आहे. त्याठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास आलेल्या चोरट्यांनी दुकानाची भिंत फोडून आत प्रवेश करीत तेथील ८ लाख १३ हजार २०९ रुपयांचे २८ मोबाईल चोरी केले.
चोरीचा हा सर्व थरार सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी कोन गाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.