
मुंबई: रविवारी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने कांस्यपदक जिंकले आहे. तिने हे कांस्यपदक १० मीटर एअर पिस्टोल प्रकारात जिंकले. या पद्धतीने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक मिळाले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कांस्यपदक जिंकणाऱ्या मनू भाकरशी फोनवर बातचीत केले. तिचे खूप अभिनंदन केले. गेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये रायफलने दगा दिला होता. मात्र यावेळी सगळ्या समस्या दूर सारत तिने यश मिळवल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी अभिनंदन केले.
पंतप्रधान मोदी फोनवर म्हणाले, खूप-खूप अभिनंदन. तुझ्या विजयाची बातमी ऐकून खूप उत्साह आणि आनंद झाला आहे. ०.१ ने रौप्य पदक राहिले. मात्र तरीही तू देशाचे नाव रोशन केलेस. तुम्हाला दोन प्रकारचे क्रेडिट मिळत आहे. एकतर तुम्ही कांस्यपदक जिंकले आणि भारताच्या पहिल्या महिला जिने नेमबाजीत पदक मिळवलेले आहे. माझ्याकडून शुभेच्छा.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये रायफलने दगा दिला होता. मात्र यावेळी सगळ्या कमतरता भरून काढल्या. मला विश्वास आहे की पुढेही तुम्ही चांगले कराल. सुरूवात चांगली आहे यामुळे उत्साह नक्कीच वाढेल आणि आत्मविश्वासही वाढेल. यामुळे देशालाही लाभ होईल. बाकी सर्व साथीदार खूश आणि आनंदी आहेत ना? तसेच खेळाडूंना योग्य सोयी-सुविधा मिळत असल्याबद्दलही त्यांनी मनू भाकरला विचारले.