मुंबई: जेव्हा आपण जेवण खातो तेव्हा आपल्या पोटात गॅस निर्माण होतो. या गॅसमुळे पोट फुगते आणि आपल्याला कसेतरी होते. काही खाण्या-पिण्याच्या गोष्टी आणि सवयी या समस्येला वाढवू शकतात.
हळू हळू खा – नेहमी हळू हळू आणि चावून खाल्ले पाहिजे. असे खाल्ल्याने जेवण व्यवस्थित पचते आणि गॅसची समस्या कमी होते.
कमी मसालेदार खाणे – मसालेदार आणि तळलेले पदार्थ पोट फुगण्याचे मोठे कारण असू शकते. यापासून बचावासाठी हलका आणि बॅलन्स डाएट घ्या.
फायबरयुक्त खाणे- फायबर पोटासाठी चांगले असते. सॅलड, फळे, हिरव्या भाज्या अधिक खा.
पाणी पिण्याची पद्धत बदला- जेवणानंतर लगेचच पाणी नका पिऊ. जर पाणी प्यायचेच असेल तर जेवणाच्या अर्धा तास आधी अथवा एका तासानंतर प्या.
ओव्याचे पाणी – जेवणानंतर ओव्याचे पाणी प्यायल्याने गॅसची समस्या कमी होते. नाहीतर हिंगाची पावडर कोमट पाण्यात मिसळून प्यायल्याने पोटातून गॅस बाहेर निघतो.