पाहा कसे असेल रेल्वेचे वेळापत्रक?
मुंबई : गणेशोत्सव (Ganeshotsav) जवळ येताच अनेक चाकरमानी गणपती बाप्पाचे आगमनासाठी कोकणात जातात. त्यामुळे दोन ते तीन महिने आधीच तिकीट बुकिंग करण्यासाठी धाव घेतात. मात्र लांब रांगेत उभे राहूनही अनेकांना एसटी किंवा रेल्वेचे आरक्षण मिळत नाही. प्रवाशांची ही गरज लक्षात घेता दरवर्षी रेल्वे प्रशासनाकडून जादा रेल्वे गाड्या सोडण्यात येतात. काही दिवसांपूर्वी गणेशोत्सवानिमित्त मध्य रेल्वेने (Central Railway) काही विशेष गाड्यांची घोषणा केली होती. त्यानंतर आता पश्चिम रेल्वेनेही (Western Railway) विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चाकरमान्यांना कोकणात जाणे अधिक सोयीस्कर होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवादरम्यान होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई सेंट्रल-ठोकूर, मुंबई सेंट्रल-सावंतवाडी रोड, वांद्रे टर्मिनस-कुडाळ, अहमदाबाद-कुडाळ, विश्वमित्री-कुडाळ आणि अहमदाबाद-मंगळुरु स्थानकादरम्यान विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.
असे आहे रेल्वेचे नियोजन
- ट्रेन क्रमांक ०९००१/०९००२ मुंबई सेंट्रल – ठोकूर साप्ताहिक विशेष
मुंबई सेंट्रल – ठाकूर साप्ताहिक स्पेशल दर मंगळवारी मुंबई सेंट्रलवरून रात्री १२ वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८.५० वाजता ठाकूरला पोहोचेल. ही ट्रेन ३ ते १७ सप्टेंबर पर्यंत धावेल. त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक ०९००२ ठाकुर – मुंबई सेंट्रल साप्ताहिक स्पेशल ही ठाकुर येथून दर बुधवारी रात्री ११ वाजता सुटेल आणि मुंबई सेंट्रलला दुसऱ्या दिवशी ०७.०५ वाजता पोहोचेल. ही ट्रेन ४ ते १८ सप्टेंबर २०२४ पर्यंत धावणार आहे.
- ट्रेन क्रमांक ०९००९/०९०१० मुंबई सेंट्रल – सावंतवाडी रोड स्पेशल [२६ फेऱ्या]
ट्रेन क्रमांक ०९००९ मुंबई सेंट्रल – सावंतवाडी रोड स्पेशल ही मुंबई सेंट्रल येथून दररोज (मंगळवार वगळता) १२ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी अडीच वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल. ही ट्रेन २ ते १६ सप्टेंबर २०२४ दरम्यान धावणार. तर ट्रेन क्रमांक ०९०१० ही सावंतवाडी रोड – मुंबई सेंट्रल स्पेशल सावंतवाडी रोडवरून दररोज (बुधवार वगळता) पहाटे ४.५० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी ८.१० वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. ही ट्रेन ३ ते १७ सप्टेंबर दरम्यान धावणार आहे.
- ट्रेन क्रमांक ०९०१५/०९०१६ वांद्रे टर्मिनस – कुडाळ साप्ताहिक विशेष [६ फेऱ्या]
ट्रेन क्रमांक ०९०१५ वांद्रे टर्मिनस – कुडाळ साप्ताहिक स्पेशल वांद्रे टर्मिनस येथून दर गुरुवारी दुपारी २.४० वाजता सुटेल आणि कुडाळला दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ३.३० वाजता पोहोचेल. ही ट्रेन ५ ते १९ सप्टेंबर दरम्यान धावणार आहे. तसेच ट्रेन क्रमांक ०९०१६ कुडाळ – वांद्रे टर्मिनस साप्ताहिक स्पेशल कुडाळ येथून दर शुक्रवारी ०४.३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी वांद्रे टर्मिनस येथे सायंकाळी सव्वा सहा वाजता पोहोचेल. ही ट्रेन ६ ते २० सप्टेंबर कालावधीत धावणार आहे.
- ट्रेन नंबर ०९४१२/०९४११ अहमदाबाद – कुडाळ साप्ताहिक विशेष
ट्रेन क्रमांक ०९४१२ अहमदाबाद – कुडाळ साप्ताहिक विशेष अहमदाबादहून दर मंगळवारी सकाळी ०९.३० वाजता सुटेल आणि कुडाळला दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ३.३० वाजता पोहोचेल. ही ट्रेन ३ ते १७ सप्टेंबर दरम्यान धावणार आहे. तसेच ट्रेन क्रमांक ०९४११ कुडाळ – अहमदाबाद साप्ताहिक विशेष ही कुडाळ येथून दर बुधवारी पहाटे ४.३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी अहमदाबादला रात्री ११.४५ वाजता पोहोचेल. ही ट्रेन ४ ते १८ सप्टेंबर पर्यंत धावेल.
- ट्रेन क्रमांक ०९१५०/०९१४९ विश्वामित्री – कुडाळ साप्ताहिक विशेष [६ फेऱ्या]
ट्रेन क्रमांक ०९१५० विश्वामित्री – कुडाळ साप्ताहिक विशेष गाडी विश्वामित्री येथून दर सोमवारी सकाळी १०.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ३.३० वाजता कुडाळला पोहोचेल. ही ट्रेन २ ते १६ सप्टेंबर दरम्यान धावेल. तसेच ट्रेन क्रमांक ०९१४९ कुडाळ – विश्वामित्री साप्ताहिक स्पेशल कुडाळ येथून दर मंगळवारी पहाटे ४.३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री १० वाजता विश्वामित्री येथे पोहोचेल. ही ट्रेन ३ ते १७ सप्टेंबर पर्यंत धावणार आहे.
- ट्रेन क्रमांक ०९४२४ अहमदाबाद – मंगळुरु साप्ताहिक विशेष
अहमदाबादहून दर शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता सुटेल आणि मंगळुरूला दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७.४५ वाजता पोहोचेल. ही ट्रेन ६ ते २० सप्टेंबर या कालावधीत धावेल. त्याचबरोबर ट्रेन क्रमांक ०९४२३ मंगळुरू – अहमदाबाद वीकली स्पेशल मंगळुरूहून दर शनिवारी रात्री १०.१० वाजता सुटेल आणि सोमवारी अहमदाबादला मध्यरात्री २.१५ वाजता पोहोचेल. ही ट्रेन ७ ते २१ सप्टेंबर दरम्यान धावणार आहे.
कधी करता येणार बुकिंग?
गाडी क्रमांक ०९००१, ०९००९,०९०१५, ०९४१२, ०९१५० आणि ०९४२४ यांसाठी २८ जुलै २०२४ पासून सर्व PRS काउंटर आणि IRCTC वेबसाइटवर बुकिंग सुरू होणार आहे.