Thursday, October 30, 2025
Happy Diwali

Government Job : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! LICमध्ये तब्बल २०० पदांची मेगाभरती

Government Job : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! LICमध्ये तब्बल २०० पदांची मेगाभरती

'असा' करा अर्ज; जाणून घ्या सविस्तर माहिती

मुंबई : सरकारी नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) मेगाभरती जारी केली आहे. कनिष्ठ सहाय्यक या पदाच्या तब्बल २०० रिक्त जागांसाठी ही भरती जारी केली आहे. यासाठी अर्ज प्रकिया सुरु झाली असून इच्छुक उमेदवार १४ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करु शकणार आहेत. जाणून घ्या याबाबतची लागणारी सर्व माहिती.

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून ६० टक्के गुणांसह पदवी प्राप्त केलेली असणे गरजेचे आहे. उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. तसेच २१ ते २८ वर्षे वयोगटातील उमेदवारच या पदासाठी अर्ज करू शकणार आहेत.

अर्ज फी

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ८०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. यासाठी lichousing.com या वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे.

परीक्षा पद्धत

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल. तसेच निवड झालेल्या उमेदवाराची नोकरीसाठी ज्या शहरात पोस्टिंग केली जाईल त्यानुसार वेतन देण्यात येईल. अंदाजे पात्र उमेदवारांना ३२ हजार ते ३५ हजार रुपयांपर्यंत मासिक वेतन दिले जाईल.

Comments
Add Comment