मुंबई: पावसाळ्याच्या दिवसांत कपडे सुकणे हा सर्वात मोठा प्रॉब्लेम असतो. पावसाळ्याच्या दिवसांत दमट हवामानामुळे कपडे सुकत नाही.
दरम्यान, कपडे सुकवण्यासाठी आणखी काही पद्धतींचा वापर केला जातो. यामुळे कपडे सुकण्यास मदत होते. पावसाळ्याच्या दिवसांत कपडे सुकवण्यासाठी क्लॉथ स्टँड फायदेशीर ठरू शकते. यामुळे सहज तुम्ही घरात कपडे सुकवू शकता.
क्लॉथ स्टँडवर कपडे अगदी सहज सुकतात. यासोबतच छोट्या स्टँडवर अनेक कपडे सुकवू शकता. तुमच्याकडे जर वॉशिंग मशीन असेल तर तुम्ही याच्या ड्रायरचा वापर करू शकता.
तुम्ही हाताने कपडे धुवून ड्रायरमध्ये सुकवायला टाकू शकता. यामुळे कपडे ड्रायरमध्ये टाकल्यानंतर क्लॉथ स्टँडवर सुकण्यासाठी वाळत घाला.
क्लॉथ स्टँड अशा ठिकाणी ठेवा जिथे पंखा सुरू असेल. यामुळे कपडे लवकर वाळले जातील. क्लॉथ स्टँडवर कपड्यांना सुकण्यासाठी व्यवस्थित जागा मिळते.
जर तुम्हाला कपडे लवकर सुकवायचे असतील तर कपड्यांवर न्यूजपेपर ठेवून तुम्ही त्यावर हळू हळू इस्त्री फिरवा. याशिवाय कपडे लवकर सुकवण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर करू शकता.