Monday, May 12, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

SSC HSC Exam : पावसामुळे परीक्षा केंद्रावर पोहोचू न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी!

SSC HSC Exam : पावसामुळे परीक्षा केंद्रावर पोहोचू न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी!

दहावी बारावी विद्यार्थ्यांना मिळणार दुसरी संधी; महाराष्ट्र शिक्षण मंडळाचा निर्णय


मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रात काल रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. सध्या संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे सखल भागात पाणी साचले आहे. एकीकडे पावसामुळे वाहतूक सेवा विस्कळीत झाल्यामुळे चांगलीच तारांबळ उडत आहे तर दुसरीकडे या पावसाचा फटका विद्यार्थ्यांच्या परीक्षेलाही बसला असल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक विद्यार्थी वेळेत पुरवणी परीक्षा देण्यासाठी पोहोचू न शकल्याने शिक्षण मंडळाने दहावी- बारावीच्या पुरवणी परीक्षेसंदर्भात एक निर्णय घेतला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान दहावी व बारावी विद्यार्थ्यांचा पुरवणी परीक्षेचे आयोजन केले होते. परंतु राज्यभरात पावसाने थैमान घातल्यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचू शकले नाहीत. मात्र अशा विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षा देण्याची आणखी एक संधी मिळणार असल्याची घोषणा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याकडून करण्यात आली आहे.


त्याचबरोबर राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे परिस्थितीचा आढावा घेऊन दहावी बारावीच्या पुरवणी परीक्षेचा दुपारी तीन वाजता होणारा पेपर रद्द करण्याचा निर्णय जाहीर करु, अशी माहिती गोसावी यांनी दिली आहे.



उद्याचा पेपरही रद्द


पावसाचा जोर आणखी काही दिवस असाच कायम राहणार असल्यामुळे दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांचा उद्या होणारा पेपरदेखील रद्द करु, असे शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

Comments
Add Comment