Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीRaj Thackeray : आता युती-आघाडी नाही तर स्वबळावर २२५-२५० जागा लढणार!

Raj Thackeray : आता युती-आघाडी नाही तर स्वबळावर २२५-२५० जागा लढणार!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मोठी घोषणा

मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) वेळी महायुतीला (Mahayuti) पूर्णपणे पाठिंबा दिला. त्यांनी ज्या ठिकाणी जाहीर सभा घेतल्या त्या ठिकाणी महायुतीचे उमेदवारही निवडून आले. त्यामुळे राज ठाकरे विधानसभेसाठी नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात अखेर राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळेस त्यांनी आता युती-आघाडी नव्हे तर स्वबळावर २२५-२५० जागा लढणार असल्याचे मोठे विधान केले. मनसे कार्यकर्त्यांना यासाठी तयारीला लागण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

राज ठाकरे म्हणाले, कोणाशी युती होईल किंवा आपल्यासाठी कोणती जागा सुटेल, याचा विचार करत बसू नका. आपल्याला २२५ ते २५० जागा लढवायच्या आहेत, असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे लोकसभा निवडणुकीप्रमाणे मनसे महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर आता महायुतीचे नेते राज ठाकरे यांची मनधरणी करण्यासाठी शिवतीर्थवर जाणार का, हे पाहावे लागेल.

जो निवडून येणारा असेल त्यालाच तिकीट मिळेल

उमेदवारांना तिकीट देण्याबाबत राज ठाकरे म्हणाले, आपण पक्षातील काही लोक पाठवून सर्व्हे करतोय. पहिला सर्व्हे झाला, तुमच्या मतदारसंघात ते लोक येऊन गेलेत. आता पुढे ते लोक येऊन तुम्हाला भेटतील, तुमच्या इथली परिस्थिती त्यांना सांगा. आगामी विधानसभा निवडणुकीत मनसेकडून निवडून येण्याची क्षमता असलेल्या लोकांनाच उमेदवारी दिली जाईल. तिकीट मिळालं की मी पैसे काढायला मोकळा अशा मनोवृत्तीच्या कोणत्याही व्यक्तीला तिकीट दिलं जाणार नाही. जिल्हा अध्यक्ष शहर अध्यक्ष यांनी माहिती प्रामाणिकपणे द्या, दिलेली माहिती चेक केली जाईल, असं राज ठाकरे म्हणाले.

काही लोक हसतील, पण…

आगामी विधानसभा निवडणुकीत मला काहीही करुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लोक सत्तेत बसवायचे आहेत. यावर अनेकजण हसतील, त्यांना हसू दे. पण ती गोष्ट घडणार म्हणजे घडणार. आपण सव्वा दोनशे जागा लढणार आहोत. कोणतीही युती नाही. १ ऑगस्टपासून महाराष्ट्र दौरा मी करणार आहे. यावेळी मी बैठका घेणार आहे, असं राज ठाकरे म्हणाले. येत्या दोन दिवसात दुसऱ्या सर्व्हेला आपले नेते येतील. निवडणुकीच्या तयारीला लागा, असं राज ठाकरे म्हणाले.

विद्युतस्मशान भूमीत वाढ व्हायला हवी

अनेक हजारो एकरात लाकूडतोड सुरु आहे. आपल्या काही गोष्टी आपण सुधारणं गरजेचं आहे. होळी आली की सांगतो जंगलतोड नको. आपण मुळात धर्माकडे पाहिले पाहिजे. लाकडाचा उपयोग स्मशानात होतोय. यात सुधारणा होणं गरजेचं आहे. काही गोष्टी आपल्याला बदलाव्या लागतील. ज्यांच्याकडे जंगलं आहेत ते लोकं पुरत आहेत. राज्य सरकारने विद्युतस्मशान भूमी वाढवल्या पाहिजेत, असं राज ठाकरे म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -