मुंबई: पॅरिस ऑलिम्पिक २०२४मध्ये(Paris Olympics 2024) भारताची सुरूवात आजपासून म्हणजे २५ जुलैपासून होत आहे. खेळाच्या महाकुंभाचे उद्घाटन २६ जुलै शुक्रवारपासून होत आहे. मात्र भारताच्या अभियानाची सुरूवात एक दिवस आधीच होत आहे. यावेळेस ११७ सदस्यीय संघाचे भारतीय दल या स्पर्धेत भाग घेत आहे.
भारत तिरंदाजीने सुरूवात करत आहे. दरम्यान, आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये एकदाही भारताला पदक मिळालेले नाही. त्यामुळे भारताला पहिल्या दिवशी पदक मिळवण्याचे ध्येय तिरंदाजांचे असेल.
पहिल्या दिवशी तिरंदाजीत भारताचे वेळापत्रक
महिला – दुपारी १ वाजता महिला वैयक्तिक रँकिंग राऊंड असेल. महिलांमध्ये दीपिका कुमारी, अंकिता भक्त आणि भजन कौर भाग घेईल.
पुरुष – त्यानंतर संध्याकाळी पावणेसहा वाजता पुरुषांच्या वैयक्तिक रँकिंग राऊंड असेल. पुरुषांमध्ये बी धीरज, तरुणदीप राय आणि प्रवीण जाधव भाग घेत आहेत.
कुठे पाहू शकता लाईव्ह?
पहिल्या दिवशी होणारे तिरंदाजीचे खेळ भारतात वायकॉम १८च्या स्पोर्ट्स आणि डीडी स्पोर्ट्स १.० च्या माध्यमातून लाईव्ह प्रसारित केले जातील. याशिवाय जिओ सिनेमाच्या माध्यमातून तुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.