मुंबई: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ची(Paris Olympics 2024) सुरूवात झाली आहे. यात भारतासाठी आजचा दिवस शानदार राहिला. भारताच्या पुरुष आणि महिला तिरंदाजी संघाने क्वार्टरफायनलमध्ये स्थान मिळवले आहे. गुरूवारी झालेल्या सामन्यात भारतीय तिरंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. भारताच्या महिला संघामध्ये दीपिका कुमारी, अंकिता भकत आणि भजन कौर आहेत. तर पुरुषांच्या संघामध्ये धीरज बोम्मादेवरा, तरूणदीप रॉय आणि प्रवीण सामील आहेत. यात धीरजची कामगिरी चांगली राहिली.
भारताचा पुरुष संघ क्वार्टरफायनलमध्ये पोहोचला आहे. ते तिसऱ्या स्थानावर राहिले. भारताला २०१३ अंक मिळाले. यात कोरियाचा संघ टॉपवर होता. त्यांना २०४९ गुण मिळले. तर फ्रान्स २०२५ पॉईंट्ससह दुसऱ्या स्थानावर राहिले. भारताबद्दल बोलायचे झाल्यास त्यांनी चीन, जपान आणि इटलीसह अनेक देशांना मागे सोडले.
भारताच्या पुरुष संघाचे तिरंदाज वैयक्तिक रँकिंगमध्ये चौथ्या स्थानावर राहिले. त्यांनी ६८१ गुण मिळवले. यात कोरियासाठी किम वूजिंग टॉपवर राहिला. भारताच्या तरूणदीप राय १४व्या स्थानावर राहिले. त्यांना ६७४ पॉईंट्स मिळाले.
महिला संघानेही जबरदस्त कामगिरी केली. भारताचा महिला तिरंदाजी संघ क्वार्टर फायनलमध्ये पोहोचला आहे. अंकिता ११व्या स्थानावर राहिली. भजन कौर २२व्या स्थानावर राहिली. तर दीपिका २३व्या स्थानावर राहिली. भारताचा महिला तिरंदाजी संघ चौथ्या स्थानावर राहिला होता. त्यांना १९८३ गुण मिळाले होते.