मुंबई: तुम्ही पाहिले असेल की काही फळांवर छोटे छोटे स्टिकर्स लावलेले असतात. यावर लावलेल्या स्टिकर्सचा अर्थ वेगवेगळा असतो. याच्या क्वालिटीबद्दल ते सांगतात. तुम्ही फळे खरेदी करायला गेलेले असताना ते पाहिले असेल.
फळांवर लागलेल्या या स्टिकर्सना पीएलयू कोड म्हटले जाते. याचा अर्थ आहे प्राईस लुक अप कोड. यात काही नंबर आणि बारकोड लिहिलेले असतात. जर हे नंबर ५ डिजीट असतील आणि ९ नंबर कोडने सुरू होत असतील तर ते ऑरगॅनिकक आहे. जर ५ डिजीट कोड आहे आणि ८ पासून सुरू होत असेल तर पिकवण्यासाठी मॉडिफाय करण्यात आले आहेत.
जर कोड चार अंकांचा असेल तर कीटकनाशकाचा वापर केलेला असतो. याच कारणामुळे आजकाल सोशल मीडियावर चार अंकाचे कोड असलेली फळे खरेदी करण्यास मनाई आहे.
हा कोड इंटरनॅशनल फेडरेशन फॉर प्रोड्यूस स्टँडर्डच्या हिशेबाने आहे. मात्र भारतात याचा वापर केला जात आहे. दुसऱ्या देशांमध्ये याचा वापर होतो.
भारताबद्दल बोलायचे झाल्यास FSSAIनुसार येथे फळवाले OK Tested छापलेले स्टिकर लावतात. याबाबत कोणतेही नियम नाहीत. हे सर्व फळांना प्राईम दाखवण्यासाठी केले जाते. दुसऱ्या देशांमध्येही याबाबत काही खास नियम नाहीत.