मुंबई: रिलायन्स जिओ आपल्या युजर्सला विविध शानदार ऑफर्स देत असतात. दरम्यान, नुकत्याच जिओने आपल्या मोबाईल रिचार्ज प्लान्सची किंमत वाढ केला आहे. आता या कंपनीने युजर्ससाठी एक खास ऑफर सादर केली आहे.
कंपनीने ही ऑफर स्वातंत्र्यदिनानिमित्त सादर केली आहे. १५ ऑगस्टच्या दिवशी भारत आपला ७८वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. टेलिकॉम सेक्टरमधील अनेक कंपन्या या निमित्ताने सर्व देशवासियांसाठी खास काहीतरी घेऊन येत आहेत. त्यातच रिलायन्स जिओनेही काही खास ऑफर आणली आहे.
१००० रूपयांची सूट
रिलायन्स जिओने ७८व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त एअरफायबर सर्व्हिसच्या युजर्ससाठी आणखी एक ऑफर सादर केली. या ऑफरअंतर्गत जिओच्या एअरफायबर ब्रॉडबँड कनेक्शन लावणारे लोक १००० रूपयांची बचत करू शकतात.
खरंतर, तुम्ही रिलायन्स जिओचे नवे एअरफायबर कनेक्शन लावले तर तुम्हाला १००० रूपयांचे अतिरिक्त इन्स्टॉलेशन चार्ज द्यावे लागतात. मात्र स्वातंत्र्यदिनी कंपनीने नव्या युजर्ससाठी फ्रीमध्ये एअरफायबर कनेक्शन इन्स्टॉल करण्याची ऑफर दिली आहे.