मुंबई: मुंबईचे हवामान पाहता पोलिसांनी लोकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. मुंबई पोलिसांनी म्हटले की हवामान विभागाने शुक्रवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. अशातच मुंबईकरांसाठी आवाहन आहे की गरज असेल तर घराबाहेर पडा. नाहीतर घरातच राहा. तसेच कोणत्याही प्रकारच्या आपातकालीन मदतीसाठी १०० अथवा १०२ डायल करून संपर्क करण्याचे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.
मुंबई आणि ठाणेमधील सर्व शाळा बंद
IMD has declared a Red alert for Mumbai till tomorrow morning 8.30am. Requesting all Mumbaikars to stay indoors, until essential. Please stay safe. #Dial100 #Dial112 in case of any emergencies.#MonsoonUpdates#StaySafe
— मुंबई पोलीस – Mumbai Police (@MumbaiPolice) July 25, 2024
मुसळधार पावसामुळे मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरूवारी सकाळी चार वाजल्यापासून ते दुपारी १ वाजेपर्यंत मुंबईतील अनेक भागांमध्ये १०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. पीटीआयच्या माहितीनुसार या दरम्यान अधेरीच्या मालपा डोंगरी क्षेत्रात सर्वाधिक १५७ मिमी पावसाची नोंद झाली.
हवामान विभागाने पुढील २४ तासांत सकाळी आठ वाजल्यापासून शहर तसेच उपनगरांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.