नवी दिल्ली: महागाई हा जगात बनलेला सर्वात मोठा यक्षप्रश्न आहे. जगभरातील अनेक देशांसाठी वाढती महागाई त्रासदायक ठरत आहे. जगातील मोठमोठ्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत भारतात महागाई दर त्या मानाने कमीच आहे. अर्जेंटिनाचा महागाई दर हा भारताच्या तुलनेने ६० टक्के अधिक आहे. महागाईची झळ सोसत असलेल्या देशांमध्ये सगळ्यात वरच्या स्थानावर अर्जेंटिना आहे. अर्जेंटिनामध्ये महागाई दर २७२ टक्के आहे.
नुकतेच वर्ल्ड ऑफ स्टेटिस्टिक्सने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर जगभरातील देशांच्या महागाईबाबत यादी जाहीर केली. यात टॉप १० देशांमध्ये अर्जेंटिना, सीरिया, तुर्की, लेबनॉन, व्हेनेझुएला, नायजेरिया, इजिप्त, पाकिस्तान, बांग्लादेश आणि रशिया या देशांचा समावेश आहे.
सीरिया दुसऱ्या स्थानावर
या यादीत सीरिया दुसऱ्या स्थानावर आहे. सीरियामध्ये महागाई दर १४० टक्के आहे. या यादीत तिसऱ्या स्थानावर तुर्की आहे. येथे महागाई द ७१.६ टक्के आहे. यानंतर लेबनॉनमध्ये ५१.६ टक्के, व्हेनेझुएलामध्ये ५१.४ टक्के, नायजेरियामध्ये ३४.१९ टक्के, इजिप्तमध्ये २७.५ टक्के, पाकिस्तानात १२.६ टक्के, बांगलादेशात ९.७२ टक्के, रशियामध्ये ८.६ टक्के आहे.
या यादीत भारत १३व्या स्थानावर आहे. येथे महागाई दर ५.०८ टक्के आहे. या यादीतील अव्वल स्थानावरील अर्जेंटिना देशाचा महागाई दर
भारतापेक्षा ६० पटींनी अधिक महागाई अर्जेंटिनामध्ये
भारतापेक्षा तब्बल ६० पटींनी अधिक आहे. भारताचे शेजारील देश पाकिस्तान आणि बांगलादेशही या यादीत टॉप १०मध्ये आहेत.
सर्वात महागाईचे देश
अर्जेंटिना २७२ टक्के
सीरिया १४० टक्के
तुर्की ७१.६ टक्के
लेबनॉन ५१.६ टक्के
व्हेनेझुएला ५१.४ टक्के
नायजेरिया ३४.१९ टक्के
इजिप्त २७.५ टक्के
पाकिस्तान १२.६ टक्के
बांग्लादेश ९.७२ टक्के
रशिया ८.६ टक्के