अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता; बचावकार्य सुरु
नेपाळ : नेपाळची (Nepal) राजधानी काठमांडू येथून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. आज सकाळी काठमांडू (Kathmandu) येथील एक विमान उड्डाण करण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा भीषण अपघात (Nepal Plane Crash) झाल्याचे समोर आले आहे. काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सौर्य एअरलाइन्सचे विमान धावपट्टीवरुन घसरुन क्रॅश झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अपघाताची माहिती मिळताचा घटनास्थळी मदतकार्यासाठी पथके दाखल झाली आहेत. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विमानतळावर तैनात असलेल्या एका सुरक्षा अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, देशांतर्गत सौर्य एअरलाइन्सचे हे विमान पोखरा या लोकप्रिय रिसॉर्ट शहराकडे जात असताना आज सकाळी ११ च्या सुमारास हा अपघात झाला. उड्डाण घेत असताना या विमानाला अचानक आग लागून विमान धूराचे मोठे लोट सोडत होते. विमानामध्ये कर्मचाऱ्यांसह इतर १९ जण उपस्थित होते. या अपघातामध्ये विमानाचा पायलट जखमी झाला असून त्याला नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे.
दरम्यान, सध्या विमानाला लागलेली आग आटोक्यात आणली आहे. तसेच अपघातस्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान बचावकार्य सुरु आहे. मात्र अद्यापही विमानातील इतर प्रवाशांच्या प्रकृतीबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही.
Saurya Airlines aircraft crashes during takeoff in Tribhuvan International Airport, Kathmandu. 19 people were aboard the Pokhara-bound plane. #Nepal #SauryaAirlines #planecrash pic.twitter.com/ypAgNE98ww
— Asia News (@asianewsteam) July 24, 2024