आयुष्यातील रेड फ्लॅग ओळखा

Share

जी व्यक्ती वारंवार तुमच्यावर संशय घेत आहे, तुमच्यावर प्रश्न उठवत आहे, तुमच्या वागण्या-बोलण्याचा गैर अर्थ काढत आहे, तुम्हाला स्वतःच्या सोईनुसार जज करते आहे, तुमची उत्तरपत्रिका तपासते आहे, तर समजून घ्या ही व्यक्ती रेड फ्लॅग आहे. अशा प्रकरच्या कोणत्याही व्यक्तीसोबत पुढे जाताना, कोणत्याही स्वरूपाची मानसिक, भावनिक, आर्थिक गुंतवणूक करताना, स्वतःला अशा व्यक्तीच्या स्वाधीन करताना अनेकदा विचार करावा. अशा व्यक्ती कधीही बदलत नसतात, कधीही त्यांच्यातील चांगुलपणा, माणुसकी जागृत होत नसते. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

फॅमिली काऊन्सलिंग – मीनाक्षी जगदाळे

आदमी अपनी आदते बदल सकता है लेकिन फितरत नही’ या उक्तीनुसार आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्या, त्रास, प्रश्न, दुःख, चिंता, अपमान, अवहेलना, आर्थिक, मानसिक नुकसान, चुकीची संगत, सामाजिक बदनामी, मानसिक खच्चीकरण, हिंसाचार, घात-पात अगदी आजारपणसुद्धा आपल्याला वेळोवेळी आयुष्याने दाखवलेले रेड फ्लॅग आहेत. म्हणजेच लाल झेंडा, धोका, फाजील आत्मविश्वास बाळगल्यामुळे, चुकीच्या व्यक्तींवर विश्वास टाकल्यामुळे, हटवादीपणामुळे झालेला असतो.

रोजच्या आयुष्यात कुटुंबात, कामाच्या ठिकाणी, मित्र-मैत्रिणींमध्ये, समाजात, शेजारी, नातेवाइकात कुठेही कामं करताना, राहताना, वावरताना, आपल्याला अनेकदा कोणापासून, कशापासून धोका होऊ शकतो, आपण अडचणीत येऊ शकतो, आपलं नुकसान होऊ शकतं हे आधीच लक्षात येणं, त्याची जाणीव होणं, त्याप्रमाणे स्वतःला वेळीच आवरणं महत्त्वाचे आहे. भावनेच्या भरात, प्रेमात, रागाच्या धुंदीत आपण कुठलीही परिस्थिती, आपण करत असलेली कृती, त्यांचे हेतू आणि त्याचे आपल्या जीवनावर होणारे दुरगामी परिणाम ओळखू शकत नाही.

एखाद्या गरम भांड्यात गॅसवर पाणी तापत असेल, तर आधीच आपण त्यापासून लांब राहतो. आता कोणीही न सांगता हे पाणी उकळत आहे, गरम आहे हे आपण कसं ओळखतो? त्याच्या लक्षणांवरून. पातेलं तापलेलं तापमान आजूबाजूला जाणवत, पाण्याच्या वाफा दिसतात आणि आपण समजून जातो की इथे धोका आहे. तसंच आपल्या आयुष्यात सुद्धा काहीही करण्याआधी आपल्याला अशी लक्षणं दिसलेली असतात ती आपण डोळसपणे पाहणे म्हणजेच रेड फ्लॅग ओळखणे होय. कोणतीही व्यक्ती मग ती घरातील असो, बाहेरील असो वा रिलेशनशिपमधील असो जेव्हा ती अति प्रेम, काळजी, सतत आपल्या जवळ राहण्याचा, आपला विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करते, ती आपल्यासाठी खूप काही करण्याचा आव आणते, आपल्याला इतरांपासून तोडते आहे तेव्हा समजून जायचे की त्याला आपल्याला एकटं पाडून आपला उपयोग करून घ्यायचा आहे. अशा रेड फ्लॅग व्यक्ती आयुष्यात दीर्घकाळ टिकत नाहीत. त्या जितके दिवस टिकतात, जितका वेळ आपल्याला देतात, त्यांची सवय आपल्याला लावतात, आपल्याला इमोशनल ब्लॅकमेल करतात, आपण त्यांच्यावर पूर्ण अवलंबून राहायला लागतो आणि त्यातून आपले खूप मोठे नुकसान होते.

अशा व्यक्ती ज्या फक्त स्वार्थासाठी कोणत्याही परिणामांचा विचार न करता तुम्हाला भावनिक करणे, तुमच्याकडून पैसे उकळणे, तुम्हाला कोणत्याही बाबतीत त्रासदायक ठरेल अशा गोष्टी करायला प्रवृत्त करतात. आपल्याला अनेकदा छोटे छोटे अनुभव अशा लोकांचे आलेले असतात. अनेकदा आपलं अंतर्मन आपल्याला सूचना देत असते. खूपदा आपल्या विश्वासाला तडा जाण्याच्या घटना पण घडलेल्या असतात. त्यांच्यातील प्रामाणिकपणा, खरेपणा यावर आपल्याला खूपदा संशय आलेला असतो. रेड फ्लॅग दिसलेला असतो तरीही आपण त्या त्या वेळी तर्क लावून विचार न केल्यामुळे फसत असतो. लोक तुम्हाला कशी वागणूक देतात, तुमच्या समोर काय बोलतात, मागे काय बोलतात यावरून समजतं की, ही व्यक्ती कोणत्या पातळीची आहे. कोणती व्यक्ती तुमचा आदर करतात, परिस्थितीनुसार कधी, किती आणि कसं बदलते आहे यावर तुम्हाला समजू शकतं की ही व्यक्ती रेड फ्लॅग आहे. कोणतीही व्यक्ती जी तुम्हाला अवाजवी धोके स्वीकारायला लावते, तुमच्या आत्मसन्मानाला किंमत देत नाही, तुम्हाला विचारात घेत नाही, तुम्हाला समजू शकत नाही ती व्यक्ती तुमच्यासाठी रेड फ्लॅग आहे. जी व्यक्ती स्वतःच्या चुकांना तुम्हाला कारणीभूत धरते, तुमची बदनामी करते, तुम्हाला समाजात मान खाली घालायला लावते तिथे वेळीच समजायला हवे की आपण इथे आपला वेळ, श्रम, भावना, काळजी गुंतवण्यात काहीही फायदा नाही.

कोणत्याही व्यक्तीकडे बघताना, त्याचा अभ्यास करताना प्रथम त्याच्याशी आपलं असलेलं नातं बाजूला ठेवून तटस्थपणे जर बघितलं तर हे समजणं खूप सोपं होतं. माझा नवरा, माझी बायको, माझा भाऊ, मुलगा, बहीण, आई, वडील, मित्र, मैत्रीण, गर्ल फ्रेंड् असं कोणतंही नात्याचं लेबल न लावता एक व्यक्ती म्हणून समोरील व्यक्तीचं निरीक्षण आणि अभ्यास करणे आवश्यक असतं. जेव्हा आपण नातं, जवळचं आणि आपलं, घरातलं म्हणून एखाद्याला बघतो तेव्हा आपण कधीच निरपेक्ष नसतो. माझा नवरा असं करूच शकत नाही. माझा भाऊ असं वागूच शकत नाही, माझ्या घरातील व्यक्ती अशी असूच शकत नाही. याला मी लहानचं मोठं केलं तर माझं अपत्य चूक करूच शकत नाही अशीच आपण स्वतःची खोटी समजूत काढतो कारण आपलं माणूस चुकलं आहे, आपली चॉईस चुकली आहे, आपण कोणाला ओळखण्यात चुकलो आहोत, आपल्या बाबतीत फसवणूक झाली आहे, आपले विचार, संस्कार, तत्त्व, मूल्य वाया गेलीत, परिस्थिती आपल्या हाताबाहेर गेली म्हणून आपण, आपलं मन आणि बुद्धी हे सत्य स्वीकारायला तयारच होत नाही.

आपण निरपेक्षपणे व्यक्तीचा अभ्यास न करता केवळ नात्याच्या लेबलखाली त्याला, त्याच्या चुकीच्या वागण्याला स्वीकारत राहतो आणि हे विसरून जातो की ही व्यक्ती रेड फ्लॅग होती, आहे आणि कायम तशीच राहील. या भाव-भावनांच्या गुंत्यात अडकून पडल्यामुळे आपण आयुष्यात कधीच चुकीला चूक, आयोग्यला अयोग्य म्हणून ते स्वीकारत नाही. नात्याच्या नावाखाली मग ती रेड फ्लॅग व्यक्ती आयुष्यभर आपला गैरफायदा घेत राहते. आपल्याला गृहीत धरते, आपल्याला कोणतीही किमत देत नाही तरी आपण ते नातं कुरवळात बसतो कारण सत्य पचवणं आपल्यासाठी खूप अवघड असते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीकडे पहिले स्वतंत्र व्यक्ती, स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून पाहायला शिकावे. तो आपला कोण लागतो या आधी तो माणूस म्हणून कसा वागतोय, काय करतोय, कितपत चुकतोय, का चुकतोय हे स्वीकारावं. नात्यामधील प्रेमात आंधळं होऊन अशा रेड फ्लॅग व्यक्ती एकतर तुमचं पूर्ण नुकसान करतील अथवा त्यांच्या चुकीच्या वागण्यामुळे त्यांचं प्रचंड नुकसान होईल. मग आपल्या इतक्या जवळच्या व्यक्तीला त्रास झालेला आपल्याला सहन होईल का? त्यापेक्षा निरपेक्ष बुद्धीने विचार करून आपण अशा लोकांना वेळीच सावरण्यात, समजावण्यात मदत करूयात.

meenonline@gmail.com

Recent Posts

लिंबू लोणचं

पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…

12 minutes ago

पुण्यात काँग्रेसला गळती, नेते आणि पदाधिकारी महायुतीच्या वाटेवर

पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…

23 minutes ago

भाषा हे राजकारण्यांच्या हातातले हत्यार नाही!

डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…

26 minutes ago

आदिवासी जमातीसाठी ती ठरली आरोग्यदूत

अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…

31 minutes ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, रविवार, २० एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…

43 minutes ago

PBKS vs RCB, IPL 2025: घरच्या मैदानावर पंजाब पुन्हा एकदा बेंगळुरूला भिडणार

मुंबई(ज्ञानेश सावंत): रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा संघ पावसामुळे मागच्या सामन्यात पंजाब कडून दारुण पराभूत झाला. सुरुवातीचे…

1 hour ago