मुंबई: पॅरिस ऑलिम्पिक २०२४चा(Paris Olympics 2024) उद्घाटन सोहळा २६ जुलैला होत आहे. मात्र भारताच्या पहिल्या इव्हेंटचे आयोजन २५ जुलैला होत आहे. १६ खेळांमध्ये ६९ मेडल स्पर्धांमध्ये भाग घेणारे ११७ भारतीय खेळाडू देशाचा गौरव करण्यासाठी मैदानावर उतरतील.
यंदाचे हे पथक आतापर्यंतचे सर्वात मोठे पथक आहे. अॅथलेटिक्स टीम २९ खेळाडूंसह सगळ्यात मोठी टीम आहे. यात टोकियो ऑलिम्पिक गोल्डन बॉय नीरज चोप्राही आहे. नेमबाजीत २१ खेळाडू भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करतील.
पॅरिस ऑलिम्पिक २०२४मध्ये पहिल्या पदकाची आशा
तिरंदाजीमध्ये दीपिका कुमारी आणि तरूणदीप राय २५ जुलैला रँकिंग राऊंडमध्ये भारताला पहिले पदक मिळू शकते. यानंतर २७ जुलैला संदीप सिंह/एलावेनिल वालारिवन आणि अर्जुन बबुता/रमिता जिंदल या जोड्या मिक्स १० मीटर एअर रायफल स्पर्धेत मैदानात उतरतील. पिस्तुल स्पर्धेत मनू भाकरचे पदकाचे दावेदार असतील. ६ ऑगस्टला नीरज चोप्रा जॅवेलिन थ्रो स्पर्धेच्या क्वालिफायर आणि ८ ऑगस्टला फायनलमध्ये आपला दम दाखवतील. बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधू २७ जुलैपासून ५ ऑगस्टपर्यंत भारताचे नाव रोशन करतील. मीराबाई चानू ७ ऑगस्टला महिलांच्या ४९ किग्रॅ वेटलिफ्टिंग स्पर्धेत भाग घेणार आहे. टोकियो २०२०मध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या लवलीना गोरगाहेन २७ जुलैपासून सुरू होणाऱ्या बॉक्सिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. यासोबतच दोन वेळा वर्ल्ड चॅम्पियन निखत जरीनही पदार्पण करेल.
कुठे होणार लाईव्ह स्ट्रीमिंग?
पॅरिस ऑलिम्पिकचे सरळ प्रसारण स्पोर्ट्स १८, डीडी स्पोर्ट्स १.०व उपलब्ध असेल. तर भारतात लाईव्ह स्ट्रीमिंग २६ जुलैपासून ११ ऑगस्ट २०२४पर्यंत जिओ सिनेमावर असेल.
या १६ खेळांमध्ये ११२ खेळाडू
भारतीय खेळाडू एकूण १६ खेळ – तिरंदाजी, अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, घोडेस्वारी, गोल्फ, हॉकी, ज्युडो, रोईंग, नौकायन, नेमबाजी, स्विमिंग, टेबल टेनिस आणि टेनिसमध्ये आपला जलवा दाखवतील.
टोकियो २०२०चा रेकॉर्ड
भारताने टोकियो २०२०मध्ये १ सुवर्णपदकासहित ७ पदके जिंकत रेकॉर्ड बनवला आहे. पॅरिसमध्ये यापेक्षा अधिक आकडा करण्याचे भारतीयांचे लक्ष्य असेल.