 
                            लवकरच करा अर्ज; जाणून घ्या सविस्तर माहिती
मुंबई : अनेक तरुण बँकेत काम (Bank Job) करण्याची संधीच्या शोधात असतात. अशाच तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आयबीपीएसद्वारे (IBPS Recruitment) सरकारी बँकेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी तरुणांना मिळत आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिग पर्सोनल सिलेक्शनने क्लर्क या पदासाठी तब्बल सहा हजारहून अधिक पदांची मेगाभरती जारी केली आहे. या पदासाठी अर्ज प्रकियेला सुरुवात झाली असून २८ जुलै ही अर्ज करण्याची अंतिम तारीख असणार आहे.
या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना ibps.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकणार आहेत. परंतु यासाठी उमेदवारांना प्रथम प्रिलियम आणि मुख्य परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यानंतर परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर तुमची मुलाखत घेतली जाणार आहे. याबाबतची प्रिलियम परीक्षा २४,२५ आणि ३१ ऑगस्ट २०२४ रोजी घेण्यात येईल. त्यानंतर पात्र उमेदवारांना बँकेत नोकरी करण्याची संधी मिळू शकेल.
काय आहे शैक्षणिक पात्रता, वयोगट आणि अर्ज फी?
या नोकरीसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त झालेले उमेदवार अर्ज करु शकतात. २० ते २८ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या परीक्षेसाठी ८५० रुपयांचे अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तसेच पात्र उमेदवारांना पहिल्या तीन वर्षी पगार १९,९०० रुपये असेल. त्यानंतर तो वर्षाला वाढेल, असे सांगण्यात आले आहे.

 
     
    




