Tuesday, April 22, 2025
Homeताज्या घडामोडीहा रेकॉर्ड बनवणारी पहिली भारतीय अभिनेत्री ठरली दीपिका पदुकोण, शाहरूख-प्रभासलाही टाकले मागे

हा रेकॉर्ड बनवणारी पहिली भारतीय अभिनेत्री ठरली दीपिका पदुकोण, शाहरूख-प्रभासलाही टाकले मागे

मुंबई: दीपिका पदुकोण बॉलिवूडच्या इतिहासातील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. आपल्या १७ वर्षांच्या बॉलिवूड करिअरमध्ये दीपिकाने जगभरात आपले नाव कमावले आहे. दीपिकाच्या अभिनायचे चाहते तर अनेक आहेत. तिच्या लुक्समुळेही ती अनेकदा चर्चेत असते.

दीपिका पदुकोणने या दिवशी चाहत्यांचे मन कल्कि २८९८ एडीच्या माध्यमातून जिंकले आहे. यात त्याने प्रभास, कमल हसन आणि अमिताभ बच्चनसारख्या दिग्गजांसोबत काम केले आहे. कल्कीमध्ये दीपिकाच्या कामाचे खूप कौतुक केले जात आहे. यातच दीपिका पदुकोणने एक मोठा रेकॉर्ड बनवला आहे. या यादीत शाहरूख खान आणि प्रभास यांसारख्या सुपरस्टार्सना मागे टाकले आहे.

बॉलिवूडमध्ये शाहरूखसोबत झाले पदार्पण

दीपिकाने दाक्षिणात्य सिनेमातून आपल्या करिअरची सुरूवात केली होती. यानंतर बॉलिवूडमध्ये तिने २००७मध्ये आलेल्या ओम शांती ओम सिनेमातून केली होती. या सिनेमात तिच्या सोबत शाहरूख खान होता. दोघांच्या या सिनेमाला मोठी पसंती मिळाली होती.

दीपिकाचे तीन १ हजार कोटींचे सिनेमे

दीपिकाने आपल्या १७ वर्षांच्या शानदार कारकि‍र्दीत अनेक सुपरहिट आणि ब्लॉकबस्टर सिनेमे दिले आहेत. ती १ हजार कोटींचे तीन सिनेमे करणारी पहिली अभिनेत्री बनली आहे. या बाबतीत तिने शाहरूख खान आणि प्रभास या सुपरस्टार्सनाही मागे टाकले आहे.

तीन पैकी दीपिकाने दोन १ हजार कोटींचा गल्ला जमवणारे सिनेमे शाहरूख खानसोबत केले आहे. दोघांच्या जोडीने जानेवारी २०२३मध्ये पठानने धूम केली होती. या सिनेमाने जगभरात १०६० कोटींचा गल्ला जमवला होता. हा दोघांचा पहिला सिनेमा होता. यानंतर २०२३मध्ये दोघांनी जवानमध्येही काम केले. या सिनेमाने जगभरात ११४३.५९ कोटी रूपयांचे कलेक्शन केले होते.

कल्कि १ हजार कोटींची कमाई करणारा तिसरा सिनेमा

‘कल्कि 2898 एडी’ने थिएटरमध्ये जगभरात १००० कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. यासोबतच दीपिका तीन १ हजार कोटींचे सिनेमे देणारी पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे. आतापर्यंत कोणत्याच भारतीय कलाकाराला हे जमलेले नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -