एकीकडे नाशिक शहरात हिंदू व्यवसायिकांवर प्रशासनाची अतिक्रमणाची कारवाई तर दुसरीकडे भद्रकाली वडाळा परिसरात प्रशासनाची कारवाही नाही
नाशिक : नाशिक महानगरपालिका सर्वे नंबर ४८०/३ए +३बी/६ ही मिळकत नाशिक महानगरपालिकेची ओपन पेस याची नाशिक क्षेत्र ४६६.५५ चौरस मीटर या मिळकतीवरील मंजूर लेआउट मधील नाशिक महानगरपालिकेच्या नावाने ७/१२ असून खुली (ओपन स्पेस) असून सदरील जागेवर सातपिर बाबा दर्गा या नावाने काही समाज कंटकांनी विनापरवानगी बेकायदेशीर अतिक्रमण बांधकाम केलेले आहे. याबाबत प्रशासनाला वारंवार तक्रारी करण्यात आल्या. मात्र कोणीही दखल घेतली नाही. मात्र हिंदूंच्या दुकानाचे सर्रास पद्धतीने नाशिक शहरात अतिक्रमण काढण्यात येत आहे आणि हेच आपण बघितले तर भद्रकाली वडाळा भागात प्रशासन कारवाही करण्यासाठी घाबरतांना दिसते. जणू विशिष्ट लोकांना अतिक्रमण करण्यासाठी परवानगीच देण्यात आली आहे की काय, असे स्थानिक नागरिकांचे आंदोलन स्थळी मत होते.
तसेच नाशिक मधील सिडनी टावर्स ए व सिंडनी बी या दोन इमारतीमधील नाशिक महानगरपालिकेच्या (ओपन स्पेस) जागेवर काही समाजकंटकांनी तेथे अतिक्रमण करून त्या जागेवर विनापरवानगी बांधकाम केलेले आहे. असे असतानाही २००० पासून नाशिक महापालिकेला वेळोवेळी स्थानिक नागरिकांनी तक्रार केली आहे. परंतु या तक्रारीची आजपर्यंत कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे सदर विषयाबाबत स्थानिक नागरिकांनी महानगरपालिकेच्या गेट समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
सदर विषयाबाबत २४ वर्षापासून पाठपुरावा करून देखील नाशिक महानगरपालिकेने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्याकारणाने हा पवित्रा सर्व परिसरातील रहिवासी व काही हिंदुत्ववादी संघटनांनी उचललेला आहे. जर याबाबत प्रशासनाने त्वरित कारवाई केली नाही तर स्थानिक नागरिक व संघटना रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहेत.
महानगरपालिकेच्या उप आयुक्त मयूर पाटील यांनी आंदोलन ठिकाणी भेट देऊन नागरिकांना शब्द दिला आहे की सदर अतिक्रमित भाग लवकरात लवकर काढू आणि आम्ही कळऊ, असे आश्वासन त्यांनी स्थानिक नागरिकांना दिले. त्यामुळे महापालिका किती लवकर कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी आंदोलन स्थळी मोठ्या संख्यने स्थानिक नाशिककर उपस्थित होते. यामध्ये महिलांचा देखील समावेश होता.