Sunday, May 11, 2025

विदेशताज्या घडामोडी

सगळ्यात लहान लग्न! लग्नाच्या तीन मिनिटांच्या आतच पत्नीने दिला घटस्फोट

सगळ्यात लहान लग्न! लग्नाच्या तीन मिनिटांच्या आतच पत्नीने दिला घटस्फोट

कुवैत: लग्न झाल्यानंतर अवघ्या तीन मिनिटातच पती-पत्नीने एकमेकांशी घटस्फोट घेतला. ही व्हायरल बातमी सोशल मीडियावर चर्चेचे कारण ठरली आहे. एका रिपोर्टनुसार नवऱ्या मुलाने लग्न समारंभातून निघताना नवऱ्या मुलीचा अपमान केला होता. यानंतर महिलेने लगेचच त्याच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.


लग्नाचे सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर पती-पत्नी न्यायालयातून बाहेर जाण्यासाठी जसे वळले तशी नवरीमुलगी अडखळली. नवऱ्या मुलाने पत्नी पडल्याने तिला मूर्ख म्हटले. हे ऐकून त्या महिलेला खूप राग आला आणि तिने लगेचच लग्न रद्द करण्याचा निर्णय घेतला. जजही असे करण्यास तयार झाले. त्यांनी लग्नाच्या तीन मिनिटांनीच लग्न रद्द केले. हे देशाच्या इतिहासतील सर्वात छोटे लग्न आहे.


ही घटना २०१९मध्ये झाली होती आणि सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने एक्सवर लिहिले, मी एका लग्नात गेलो होतो तेव्हा आपल्या भाषणात त्या नवरदेवाने पत्नीची खिल्ली उडवली. यात तिने तिची कोणतीही कदर केली नव्हता. त्या महिलेने हेच केलं पाहिजे होतं जे हिने केलं.


२००४मध्ये ब्रिटनमध्येही अशीच एक घटना समोर आली होती. येथे एका जोडप्याने लग्नाच्या ९० मिनिटानंतर घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. ग्रेटर मँचेस्टरमध्ये स्टॉकपोर्ट रजिस्टर कार्यालयात स्कॉट मॅकी आणि विक्टोरिया अँडरसनने शपथ घेतल्यानंतर एका तासातच नाते संपले होते.

Comments
Add Comment