IAS Pooja Khedkar : पूजा खेडकरचा कारनामा! उत्पन्न कमी दाखवण्यासाठी केला आई-वडिलांचा घटस्फोट

केंद्र सरकारकडून पुणे पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश जारी


पुणे : काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात असणाऱ्या आयएएस अधिकारी पूजा खेडकरचे (IAS Pooja Khedkar) सातत्याने नवीन कारनामे समोर येत आहेत. अशातच आता खेडकर कुटुंबियांबाबत आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. पूजा खेडकर यांनी आयएएस अधिकारी बनण्यासाठी कमी उत्पन्न दाखवण्याच्या प्रयत्नात स्वत:च्या आई-वडिलांचा घटस्फोट (Divorced) झाल्याचे दाखवले. याप्रकरणी वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची चौकशी सुरु केली जाणार आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांच्या अडचणीत आणखी भर पडणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.


आयएएस अधिकारी पूजा खेडकर या खासगी गाडीवर लाल दिवा लावणे आणि स्वतंत्र केबिनसाठी आग्रह केल्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर हे प्रकरण खेडकर यांच्या शारीरिक अपंगत्व आणि ओबीसी प्रमाणपत्रपर्यंत पोहोचले होते. आता पूजा खेडकर यांनी आई-वडिलांचा घटस्फोट झाल्याचे भासवून कमी उत्पन्न दाखविण्याचा प्रयत्न केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांचे आई-वडील मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) आणि दिलीप खेडकर (Dilip Khedkar) या दाम्पत्याचा खरच घटस्फोट झाला आहे का? याची चौकशी करण्याचे आदेश केंद्र सरकारने पुणे पोलिसांना दिले असून याबाबत सविस्तर अहवालही केंद्र सरकारने मागवला आहे.


दरम्यान, मनोरमा खेडकर यांच्यावर शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर महाडमधून पुणे पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना अटक केली होती. याबाबत न्यायालयाने मनोरमा खेडकर यांना १४ दिवसांची कोठडी सुनावली असून त्या सध्या त्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत.

Comments
Add Comment

सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर; ‘मेस्मा’लागू ; संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

मुंबई : महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला आहे. या

पुणे मेट्रो ‘कॅशलेस’ व्यवहारांमुळे राज्यात अव्वल

पुणे : केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला प्राधान्य दिल्याने ‘कॅशलेस’ व्यवहारात

पुण्याला पावसाने झोडपले

पुणे : गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी दुपारी तीनपासून पुन्हा एकदा पुण्याला अक्षरश: झोडपले.

आरोग्य विभाग करणार १७०० रुग्णवाहिकांची खरेदी!

राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे होणार एकत्रित नेटवर्क व संचलन मुंबई : आरोग्य विभागाअंतर्गत रुग्णवाहिका सेवा

लातूर जिल्ह्यात भीषण अपघातात वाघोली येथील बहिण-भावाचा जागीच मृत्यू

लातूर : लातूर जिल्ह्यातील राष्ट्रिय महामार्गावर भीषण अपघातात बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे.औसा–निलंगा

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विमानतळाचे होणार उद्घाटन; नवी मुंबईत वाहतुकीत बदल

रायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नवी मुंबई