Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीPM Narendra Modi : मध्यमवर्गीयांना ताकद देणारा, मागासवर्गीय, दलितांचं सक्षमीकरण करणारा अर्थसंकल्प!

PM Narendra Modi : मध्यमवर्गीयांना ताकद देणारा, मागासवर्गीय, दलितांचं सक्षमीकरण करणारा अर्थसंकल्प!

अर्थसंकल्पाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?

नवी दिल्ली : एनडीए सरकारच्या (NDA Government) तिसऱ्या कार्यकाळात आज केंद्रीय अर्थसंकल्प (Union budget 2024) सादर केला जात आहे. अर्थसंकल्पीय भाषणात हा अर्थसंकल्प गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी यावर केंद्रित असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी सांगितलं आहे. तसेच यात अनेक तरतूदी करण्यात आल्या असून २०२४-२५ साठी एकूण खर्च ४८,२०,५१२ कोटी रुपये अपेक्षित आहे. या अर्थसंकल्पावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘मध्यमवर्गीयांना ताकद देणारा, मागासवर्गीय, दलितांचं सक्षमीकरण करणारा हा अर्थसंकल्प’ असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘मागील १० वर्षांत २५ कोटी लोक गरीबीशी झुंजत होते. आजचा खरा अर्थसंकल्प गरीबांसाठी आहे. या अर्थसंकल्पामधून असंख्य संधी उपलब्ध होणार आहेत. शिक्षा आणि कौशल्यासाठी हा महत्वाचा अर्थसंकल्प आहे. मध्यमवर्गीयांना ताकद देणारा अर्थसंकल्प आहे. मागासवर्गीय, दलितांचं सक्षमीकरण करणारा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामध्ये अनेक योजना आहेत. या अर्थसंकल्पातून महिलांचं आर्थिक सक्षमीकरण होणार आहे. या अर्थसंकल्पातून छोट्या व्यापाऱ्यांना प्रगतीचा नवा मार्ग मिळेल, असंही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘सरंक्षण दलाला आत्मनिर्भर करण्यासाठी अनेक तरतुदी या योजनेत करण्यात आल्या. जगातील लोकांचं भारताप्रती आकर्षण वाढलं आहे. त्यामुळे पर्यटन क्षेत्रातून गरीब आणि मध्यमवर्गीयांना अनेक संधी उपलब्ध होतात. त्यामुळे या अर्थसंकल्पात पर्यटन क्षेत्रावरही भर देण्यात आला आहे.

नव्या करप्रणालीतून मिळणार दिलासा

यंदा करप्रणालीत गरीब आणि मध्यमवर्गीयांना दिलासा देण्यात आला आहे. तसेच स्टॅडंर्ड डिडक्शन देखील वाढवण्यात आला आहे. टीडीएसच्या नियमातही बदल करण्यात आले आहेत. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांवर अधिक लक्ष देण्यात आलं. छोट्या शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात विचार करण्यात आला आहे. तसेच मध्यमवर्गीयांना अन्नाची उपलब्धता होण्यासाठी होणार आहे, असेही पंतप्रधान मोदींनी सांगितले.

अर्थसंकल्पात कोणत्या महत्त्वाच्या घोषणा?

पंतप्रधान मुद्रा योजनेसह, प्रधानमंत्री आवास योजना, MSME क्षेत्र यांबाबत काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. तसेच मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह कॅन्सरवरील औषधं, सोलार पॅनल, सोने, चांदी, लिथिअम बॅटरी, इलेक्ट्रॉनिक वाहनं, चामड्याच्या वस्तू या सर्व गोष्टी स्वस्तात मिळणार आहेत. नव्या कररचनेनुसार ३ लाखांपर्यत उत्पन्न असलेल्या व्यक्तींना कर भरावा लागणार नाही. त्यामुळे नवीन कररचना स्विकारलेल्यांना दिलासा मिळाला आहे.

अर्थसंकल्पातील घोषणा सविस्तर जाणून घेण्यासाठी यावर क्लिक करा –  

Union budget 2024 : भारताचा अर्थसंकल्प गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी यांवर केंद्रीत!

 

Union Budget 2024 : इंटर्नशीप ते मॉडेल स्किल लोन… यंदाच्या अर्थसंकल्पात तरुणांसाठी खुशखबर!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -