मुंबई: दक्षिण भारतीय सिनेमामधील प्रसिद्ध अभिनेता सूर्या ४९ वर्षांचा झाला आहे. सूर्याचा जन्म २३ जुलै १९७५मध्ये तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये झाला होता. सूर्याचे खरे नाव सरवनन शिवकुमार आहे. हा तामिळ अभिनेते शिवकुमार यांचा मुलगा आहे.
सूर्य दाक्षिणात्य सिनेमांमधील एक चर्चेतील नाव आहे. कधी काळी तो आपली ओळख लपवून कपड्यांच्या फॅक्टरीमध्ये काम करून १ हजार रूपये कमावत होता. मात्र आज त्याच्याकडे कोट्यावधींची संपत्ती आहे.
सूर्याचे वडील अभिनेते होते मात्र तरीही सूर्याला सिने दुनियेत काम करायचे नव्हते. फिल्मी दुनियेत येण्याआधी तो फॅक्टरीमध्ये काम करत होते. त्याच्या बदल्यात त्याला एक हजार रूपये मिळत होते. त्याने आठ महिन्यांपर्यंत फॅक्टरीमध्ये काम केले. दरम्यान, अभिनेत्याला आपली ओळख लपवून ठेवावी लागत असे.
सूर्याचे शानदार सिनेमे
सूर्याला खरी ओळख नंदा या सिनेमाने दिली. २००१मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमासाठी सूर्याला तामिळनाडू स्टेट फिल्म अवॉर्डमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून सन्मानित करण्यात आले होते. त्याने आपल्या करिअरमध्ये रक्त चरित्र, कादले निम्मधि, अंजान, कल्याणरमन, २४, श्री, काका काका, कृष्णा, सिंघम, सोरारई पोटरू आणि निनाततु यारोसहित अनेक सिनेमे केले.
सूर्याची नेटवर्थ
सूर्याने आपल्या २७ वर्षांच्या सिने करिअरमध्ये प्रसिद्धीसह खूप दौलत कमावली. तो दक्षिणेचा महागड्या अभिनेत्यांपैकी एक आहे. रिपोर्टनुसार त्याची टोटल नेटवर्थ ३५० कोटी रूपये आहे.