मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून सोनं चांदीच्या (Gold Silver Price Hike) दरात मोठी वाढ झाली होती. सोनं चांदीने जवळपास लाखो रुपयांचा आकडा पार केला होता. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला महागाईचा चांगलाच फटका बसला होता. परंतु काही दिवसांपासून सोनं चांदीच्या दरात काहीशी घसरण पाहायला मिळत आहे. सध्या सोन्याच्या दरात २७० रुपये तर चांदीच्या दरात ३३८ रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत ७२ हजार ८९० रुपये तर चांदी ८ हजार ८६५ रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे. यामुळे नागरिकांना वाढत्या महागाईत काहीसा दिलासा मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारातील मजबूतीचा कल आणि स्थानिक ज्वेलर्सकडून नवीन मागणी यामुळे सोन्याच्या किमतीत वाढ करण्यात आली होती. मात्र सध्या १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज ७२,८९० रुपये असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७३,२४० रुपयांवर बंद झाली होती. तर चांदीही मागील ट्रेडमध्ये ८९,३७० रुपये प्रतिकिलोने विकली जात होती. ती आता ८९,०२० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.
मुंबई, पुणे, नागपूर नाशिक या शहरात २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६६,६९७ रुपये आहे. त्याचबरोबर २४ कॅरेट सोन्याची किंमत ७२,७६० प्रति १० ग्रॅमवर आहे.
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…