Wednesday, May 21, 2025

देशमहत्वाची बातमी

देशभरात पावसाचे धुमशान, महाराष्ट्र-गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

देशभरात पावसाचे धुमशान, महाराष्ट्र-गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

नवी दिल्ली: देशभरात पाऊस नुसता धुमशान घालत आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये दमदार पाऊस कोसळत आहे. याच्यामुळे मात्र अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. हवामान विभागाने २३ जुलैला मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, उत्तराखंड, ओडिशा आणि गोवामधील काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट दिला आहे.


पुढील २४ तासांत छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटकचा किनारी भाग आणि दक्षिणी राजस्थानात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर पूर्वोत्तर भारत, सिक्कीम, ओडिशा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम उत्तर प्रदेशात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळेल.


याशिवाय पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, केरळ, अंदमान-निकोबार बेट, लक्षद्वीप, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल.



राज्यात ही स्थिती


राज्यातही कोकणसह मुंबईत पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. याशिवाय पश्चिम तसेच उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Comments
Add Comment