Friday, March 21, 2025
Homeताज्या घडामोडीAirtelचा ८४ दिवसांचा सर्वात स्वस्त प्लान, मिळतायत खूप फायदे

Airtelचा ८४ दिवसांचा सर्वात स्वस्त प्लान, मिळतायत खूप फायदे

मुंबई:एअरटेलच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लान्स आहेत. हे प्लान्स विविध किंमतीचे आणि फीचर्ससोबत येतात. आज आम्ही तुम्हाला ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा सर्वात स्वस्त प्लानबद्दल सांगत आहोत.

एअरटेलच्या या प्लानची किंमत ५०९ रूपये इतकी आहे. हा प्लान तुम्हाला ३ महिन्यांची व्हॅलिडिटी देतो. जाणून घेऊया याचे फायदे

एअरटेलच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. हा प्लान ८४ दिवस चालतो. यात लोकल आणि एसटीडी कॉलचा समावेश आहे.

एअरटेलचा हा प्लान ६ जीबी डेटा लिमिटसोबत येतो. हा प्लान त्या लोकांसाठी आहे जे कॉलिंगचा वापर जास्त करतात.

एअरटेलच्या या प्लानमध्ये १०० एसएमएस मिळतात. जर तुमचा डेटा संपला तर तुम्ही या एसएमएसचा वापर करू शकता.

एअरटेलच्या या प्रीपेड रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला Free hello tunes on wynk आणि wynk musicचा फायदा मिळेल.

जिओच्या प्लानशी तुलना

एअरटेलचा हा प्लान जिओच्या व्हॅल्यू प्लानला टक्कर देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. जिओचा ४७९ रूपयांचा प्लान आहे. यात ८४ दिवसांची व्हॅलिडीटी मिळते.

जिओच्या या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉल्स मिळतात. यात लोकल आणि एसटीडीचा समावेश आहे. यात एसएमएसही मिळतात.

जिओच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला संपूर्ण प्लानमध्ये एकूण ६ जीबी डेटा मिळतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -