Tuesday, April 29, 2025
Homeसाप्ताहिकअर्थविश्वIncome Tax : अर्थसंकल्पात करप्रणालीबाबत मोठी घोषणा! किती कर भरावा लागणार?

Income Tax : अर्थसंकल्पात करप्रणालीबाबत मोठी घोषणा! किती कर भरावा लागणार?

जुन्या करप्रणालीत नेमका काय बदल झाला?

नवी दिल्ली : एनडीए सरकारच्या (NDA Government) तिसऱ्या कार्यकाळात आज केंद्रीय अर्थसंकल्प (Union budget 2024) सादर करण्यात आला. यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. सर्वसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला मुद्दा म्हणजे आयकर (Income Tax). प्रत्येकाला आपल्या पगारातून हा कर भरावा लागतो. मात्र, सध्या त्याच्या कक्षा बदलण्यात आल्या आहेत.

नवीन कर व्यवस्थेनुसार (New tax regime) काही बदल देखील करण्यात आले आहेत. दोन तृतीयांश करदात्यांनी नवी कररचना स्विकारली आहे. जुन्या कर प्रणालीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही, त्यामुळे त्यांची निराशा झाली आहे. तर नवीन कररचना स्विकारलेल्यांना दिलासा मिळाला आहे. नव्या कररचनेनुसार ३ लाखांपर्यत उत्पन्न असलेल्या व्यक्तींना कर भरावा लागणार नाही. नव्या करप्रणालीत स्टँडर्ड डिडक्शन ५० हजारांवरुन ७५ हजारांवर करण्यात आलं आहे.

किती उत्पन्न असलेल्या व्यक्तींना किती कर भरावा लागणार?

३ लाखांपर्यत उत्पन्न असलेल्या व्यक्तींना कर भरावा लागणार नाही.
३ ते ७ लाखांपर्यंत उत्पन्न – ५% कर
७ ते १० लाखांपर्यंत उत्पन्न – १०% कर
१० ते १२ लाखांपर्यंत उत्पन्न – १५% कर
१२ ते १५ लाखांपर्यंत उत्पन्न – २०% कर
१५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न – ३०% कर

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -