मुंबई: पाकिस्तानी सिंगर राहत फतेह अली खानला दुबई एअरपोर्टवर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या आधीच्या मॅनेजर सलमान अहमदने त्याच्याविरोधात केस दाखल केली आहे. राहत आपल्या म्युझिक परफॉर्मन्ससाठी दुबईला गेले होते.
पाकिस्तानी मीडियानुसार राहत फतेह अली खानचे आधीचे मॅनेजर सलमान अहमदने सिंगरविरुद्ध तक्रार दाखल केली होती. यावर कारवाई करताना त्यांना दुबई एअरपोर्टवर अटक केली आहे. राहत फतेह अली खानला यूएईमध्ये राहत असलताना बुर्ज दुबई पोलिसाांनी ताब्यात घेतले होते.
बऱ्याच काळापासून सुरू होता वाद
राहत फतेह अली खान आणि त्यांचा आधीचा मॅनेजर सलमान अहमद यांच्यात बऱ्याच काळापासून तणाव सुरू आहे. सलमान अहमदने सिंगरविरुद्ध दुबई आणि दुसऱ्या शहरांमध्ये केस दाखल केली.
सिंगरवर मनी लॉड्रिंग आणि टॅक्स चोरीचा आरोप
या वर्षाच्या सुरूवातीला फेडरल इन्वेस्टिगेशन एजन्सीने राहत फतेह अली खानच्या मुसक्या आवळल्या होत्या. राहतवर आरोप होता की त्यांनी १२ वर्षात लोकल आणि आंतरराष्ट्रीय म्युझिक कॉन्सर्टच्या माध्यमातून ८ अब्ज रूपये कमावलेत.