Monday, April 21, 2025
Homeताज्या घडामोडीManorama Khedkar : मनोरमा खेडकर यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी!

Manorama Khedkar : मनोरमा खेडकर यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी!

शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी झाली अटक

पुणे : पूजा खेडकर (Pooja Khedkar) प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. पौड पोलिसांनी अटक केलेल्या पूजा यांची आई मनोरमा खेडकरला (Manorama Khedkar) न्यायालयाने १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे. हातात पिस्तुल घेऊन शेतकऱ्यांना धमकावतानाचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर त्या फरार झाल्या होत्या. पोलिसांनी मुंबई, पुण्यातील अनेक ठिकाणी छापेमारी करत अखेर त्यांना महाड येथून ताब्यात घेतले. आता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यामुळे त्यांची रवानगी येरवडा कारागृहात (Yerwada jail) होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांना धमकवल्याप्रकरणी मनोरमा खेडकर अटकेत आहेत. मनोरमा खेडकर यांच्या बंगल्यातून पुणे पोलिसांनी पिस्तुल जप्त केले आहे. त्याचबरोबर पिस्तुलातील काही गोळ्या देखील जप्त केल्या आहेत. पिस्तुलाचा धाक दाखवून शेतकऱ्यांना धमकावल्याचा मनोरमा खेडकर यांच्यावर आरोप आहे. त्यासाठी पौड पोलिसांनी त्यांना अटक केल्यानंतर त्यांचे पिस्तुल जप्त करण्यात आले आहे.

मनोरमा खेडकर यांना अटक केल्यानंतर दोनदा पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पहिल्यांदा दोन दिवस आणि दुसऱ्यांदा देखील दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आता पोलीसांची चौकशी पूर्ण झाली असे मानून न्यायालयाने त्यांना १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सात जणांविरोधात गुन्ह्याची नोंद

मनोरमा खेडकरांच्या वकिलांनी जामीन अर्ज केला असून त्यांना लवकरात लवकर जामीन मिळावा यादृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत. या प्रकरणात सात जणांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. यात पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांचाही समावेश आहे. मात्र या सात जणांपैकी मनोरमा खेडकर यांना अटक करण्यात आली आहे. तर दिलीप खेडकर यांनी २५ जुलैपर्यंत अटकपूर्व जामीन मिळवला आहे. इतर आरोपी पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -