Wednesday, March 26, 2025
Homeताज्या घडामोडीHealth Tips: वेलचीच्या दाण्यांमध्ये असते भरपूर ताकद, अनेक आजारांना ठेवेल दूर

Health Tips: वेलचीच्या दाण्यांमध्ये असते भरपूर ताकद, अनेक आजारांना ठेवेल दूर

मुंबई: आजकाल हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज, लठ्ठपणा, वजन वाढणे आणि कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका वेगाने वाढत आहे. या आजारांचे कारण खराब लाईफस्टाईल आहे. अशातच किचनमध्ये ठेवलेला एक मसाल्याचा पदार्थ फायदेशीर ठरू शकतो.

हायपरटेंशन म्हणजेच हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यामध्ये हिरवी वेलची फायदेशीर मानली जाते. एका संशोधनानुसार हाय बीच्या २० रुग्णांना जेव्हा वेलची पावडरचे सेवन करण्यासाठी दिले तेव्हा त्यांचा बीपी नॉर्मल आढळला.

हिरवी वेलची वजन वेगाने कमी करू शकते. हे खाल्ल्याने मेटाबॉलिज्म वेगाने वाढते. यामुळे फॅट बर्न होण्यास मदत होते. याच्या सेवनाने चरबी कमी होते आणि वजन वेगाने घटते.

वेलचीच्या दाण्यांच्या सेवनाने हाय ब्लड प्रेशर आणि शुगरपासून दिलासा मिळतो. अनेक रिसर्चमध्ये वेलची ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी आणि डायबिटीज मॅनेज करण्यात यशस्वी ठरली आहे.

वेलची भूक वाढवण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. वेलची खाल्ल्याने पाचनतंत्र सुधारते आणि खूप भूक लागते.

वेलचीच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड आणि लिव्हर एन्झाईम कमी होऊ शकतात. याचा लिव्हरच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -