Tuesday, April 22, 2025
Homeताज्या घडामोडीपेणच्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी साजरा केला देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवस

पेणच्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी साजरा केला देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवस

विद्यार्थ्यांनी संवादही साधला ; देशभरातून शुभेच्छांसाठी फोन

पेण(देवा पेरवी)– महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा केला. पेणमधील दिव्यांग विद्यार्थ्यांनी आग्रह केला असता, त्याला तत्काळ प्रतिसाद देत देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन पद्धतीने वाढदिवस साजरा केला.

सुहित जीवन ट्रस्ट पेण येथे दिव्यांग मुलांची शाळा आहे. या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आज साजरा केला. देवेंद्र फडणवीस हे सातत्याने दिव्यांगाच्या बाबतीत सहकार्याची भूमिका घेतात. आमच्या संस्थेला सुद्धा त्यांनी मोठी मदत केली, असे संस्थेच्या अध्यक्षा डॉ.सुरेखा पाटील यांनी सांगत या मुलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधण्याचा आग्रह धरला. त्यांच्या विनंतीला फडणवीस यांनी मान देत त्यांच्याशी संवाद साधला, त्यांचे आभार मानले आणि त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.

दरम्यान, आज देवेंद्र फडणवीस यांना देशभरातील नेत्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपराष्ट्रपती जयदीप धनगड, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, हरदीपसिंग पुरी, पियुष गोयल, माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष सुनील तटकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सदाभाऊ खोत, महादेव जानकर, अभिनेते प्रसाद ओक, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी, नारायण राणे यांच्यासह अनेक नेत्यांनी फोन करुन शुभेच्छा दिल्या.

तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवराजसिंग चौहान, रामदास आठवले, श्रीपाद नाईक, पंकज चौधरी, अर्जून राम मेघवाल, प्रतापराव जाधव, डॉ. जितेंद्र सिंग, जी. किशन रेड्डी, किरण रिजिजू, अन्नपुर्णा देवी, ज्युएल ओराम, प्रल्हाद जोशी, डॉ. वीरेंद्र कुमार, सर्वानंद सोनोवाल, जितनराम मांझी, धर्मेंद्र प्रधान यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री तसेच योगी आदित्यनाथ, मनोहरलाल खट्टर, हेमंत बिस्वा शर्मा, डॉ. मोहन यादव, भजनलाल शर्मा, डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -