Monday, September 15, 2025

टी-२० कर्णधार सूर्यकुमारसाठी पत्नीने लिहिला हा भावूक मेसेज, पाहा

टी-२० कर्णधार सूर्यकुमारसाठी पत्नीने लिहिला हा भावूक मेसेज, पाहा

मुंबई: भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला श्रीलंका दौऱ्यासाठी टी-२० कर्णधार बनवण्यात आले आहे. सूर्याला कर्णधार बनवल्यानंतर त्याची पत्नी देविशा शेट्टीने त्याच्यासाठी भावूक मेसेज लिहिला आहे.

देविशाने इन्स्टाग्रामवर लिहिले की, जेव्हा तु भारतासाठी खेळण्यास सुरूवात केली होती तेव्हा आम्ही कधी विचार केला नव्हता की हा दिवस येईल. मात्र देव महान आहे आणि प्रत्येकाला तो त्याच्या मेहनतीचे फळ योग्य वेळी देतो. तुम्ही जे काही मिळवले आहे त्याच्यासाठी मला गर्व आहे. मात्र ही तर फक्त सुरूवात आहे अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे.

३३ वर्षीय फलंदाजाला रोहित शर्माच्या जागी भारताचा टी-२० कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. त्याला हार्दिक पांड्याऐवजी स्थान देण्यात आले. सूर्यकुमार यादव टी-२० वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारतीय संघाचाही भाग होता. सूर्याने वर्ल्डकपच्या ८ सामन्यांमध्ये १९९ धावा या २८.४२च्या सरासरीने काढल्यात.

सूर्यकुमार यादव आणि देविशा मुंबईतील एकाच कॉलेजमधून शिकले आहेत. २०१६मध्ये दोघांचे लग्न झाले होते. देविशाने आपल्या पाठीवर सूर्यकुमार यादवच्या नावाचा टॅटूही बनवला आहे. देविशा इन्स्टाग्रामवर खूप अॅक्टिव्ह आहे. ती सातत्याने सूर्यासोबतचे फोटो शेअर करत असते.

Comments
Add Comment