घन ओथंबून येती
बनांत राघू ओघिरती
पंखावरती
सर ओघळती
झाडांतून झडझडती
घन ओथंबून झरती
नदीस सागरभरती
डोंगरलाटा
वेढित वाटा
वेढित मजला नेती
घन ओथंबून आले
पिकात केसर ओले
आडोशाला
जरा बाजूला
साजण छेलछबिला
घन होऊन बिलगला
गीतकार – ना. धों. महानोर गायक – लता मंगेशकर
ये रे घना…
ये रे घना
ये रे घना
न्हावूं घाल
माझ्या मना
फुले माझी
अळुमाळू
वारा बघे
चुरगळू
नको नको
म्हणतांना
गंध गेला
रानावना
टाकुनिया घरदार
नाचणार नाचणार
नको नको म्हणतांना
मनमोर भर रानां
नको नको किती म्हणू
वाजणार दूर वेणू
बोलावतो सोसाट्याचा
वारा मला रसपाना